By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 21:08 IST
1 / 10BJP Historical Victory Rally Rajya Sabha Elections 2022, Dhananjay Mahadik Chandrakant Patil: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यात भाजपाने शिवसेनेचा एका जागेवर पराभव केला.2 / 10पाच जागांवर भाजपाचे २ तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा १-१ उमेदवार बिनविरोध निवडून आला. पण निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवारांना पराभूत करून भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला.3 / 10भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरात भव्य विजयी रॅली काढली.4 / 10सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरातून संजय पवार यांनी उमेदवारी दिली होती. त्यास लढत म्हणून भाजपानेही कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना मैदानात उतरवले.5 / 10धनंजय महाडिकांच्या विजयाने कोल्हापूर महाडिक कुटुंबाचे राजकीय वजन वाढलेच. पण त्यासोबतच मूळचे कोल्हापूरचे असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही आनंद गगनात मावत नव्हता.6 / 10राज्यसभेच्या जागेसाठी विजय मिळवल्यानंतर भाजपाच्या धनंजय महाडिकांनी आज भव्य रॅली काढत विजयोत्सव साजरा केला. 7 / 10विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्ते पाहायला मिळाले.8 / 10चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या विजयानंतर भव्य रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानले.9 / 10'महाडिक यांचा परत नाद कराल का?' अशा आशयाचे काही छोटे फलकही कार्यकर्त्यांच्या हाती दिसून आले.10 / 10भाजपा कार्यकर्त्यांना या विजयोत्सवात विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला.