1 / 9भाजपा नेते धनंजय महाडिक यांचा लेक विश्वराज महाडिक आणि मंजिरी पाटील यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ५ मेला त्यांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. 2 / 9एकीकडे लोकसभा निवडणुकांची धामधुम आणि प्रचाराची लगबग सुरू असताना धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राने लग्नगाठ बांधत नव्या आयु्ष्याला सुरुवात केली आहे. 3 / 9विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. मोठ्या थाटामाटात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. 4 / 9त्यांच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. तर महायुतीतील अनेक नेत्यांनी लग्नाला उपस्थित राहून या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. 5 / 9विश्वराज महाडिक वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. 6 / 9खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूरातील महत्वाचे राजकारणी आहेत. साखर आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात त्यांचं नाव आहे. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्यांचा एक सहकारी साखर कारखाना आहे. 7 / 9२०१९ मध्ये धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्याआधी २०१४-२०१९मध्ये ते राष्ट्रवादीचे खासदार होते. आता ते भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत. 8 / 9त्यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत. महाडिकांची तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. 9 / 9धनंजय महाडिक यांचा तिसरा मुलगा कृष्णराज महाडिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.