The city is ...
अवघं शहर... आलं सायकलवर... By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 3:15 PM1 / 10कोल्हापुरात प्रदूषण अन् कचरा मुक्तीसाठी लोकमत समुहाकडून सायकल राईड घेण्यात आली. त्यास नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला. 2 / 10चिमुकल्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच विविध वेशभुषा आणि कलाकारी करत ग्रीन कोल्हापूरसाठी सायकलाच पँडल मारला. 3 / 10रॅलीत सहभागी तरुणांकडून जय भवानी जय शिवाजीचा गजर अन् ग्रीन कोल्हापूरचा नारा देत सकाळीच चैतन्य निर्माण झालं होतं. 4 / 10या रॅलीसाठी जुन्या देशी परदेशी बनावटीच्या सायकली तसेच तरुणांनी आधुनिक गेअरच्या सायकलींसह राईड पूर्ण केली.5 / 10 स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उर्फ बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. 6 / 10वैविध्यपूर्ण वेशभूषा साकारत व जुन्या पूर्वीच्या लांब सीट असलेल्या सायकली घेऊन येथील एका ग्रुपने सर्वांचे लक्ष वेधत परंपरा व एकजुटीने राहाण्याचा संदेश दिला.7 / 10झाडे लावा, झाडे जगवा... निसर्ग माझी माता... मी तिची रक्षणकर्ता यांसह निसर्ग माझा सखा... असा संदेशही या रॅलीतून चिमुकल्यांनी दिला.8 / 10 कोल्हापूर लोकमत आयोजित ही ग्रीन कोल्हापूर सायकल राईड सर्वांच्याच आकर्षणाचे अन् स्वच्छतेच्या जनजागृतीचा विषय ठरली.9 / 10चिमुकल्यांसह पालकांचाही उत्साह या रॅलीत दिसून आला. एका आई आपल्या मुलाला सायकवर बसवून रॅलीत सहभागी होतानाचे हे टिपलेलं छायाचित्र10 / 10स्वच्छता अन् पर्यावरण जनजागृतीचा संदेश हा रॅलीतील अशा सहभागामुळे सार्थकी लागला असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणखी वाचा Subscribe to Notifications