शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंच'गंगा'माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 5:27 PM

1 / 12
कोल्हापुरातील पूरग्रस्त भागात स्थानिकांसह एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य सुरू आहे. नागिरकांना धैर्य देण्याचं कामही जवानांकडून होत आहे.
2 / 12
आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, एनडीआरएफ आणि पोलीस यांच्याकडून पूरग्रस्तांची मदत सुरु आहे. पंजाब, ओडिसा, गोवा, गुजरात अशा अनेक ठिकाणाहून बचाव पथके बोलावली आहेत.
3 / 12
कोल्हापूरसह सांगली, सातारा अन् सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले आहेत.
4 / 12
पुरात अडकलेल्या सर्वांना सुखरुप काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एअरलिफ्टिंग करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. सध्या खासगी, कोस्टगार्ड, नौदल एनडीआरएफच्या एकूण 60 बोटी सध्या कार्यरत आहेत.
5 / 12
कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदतीचे आश्वासन दिले आहे.
6 / 12
कोल्हापुरातील पूरस्थितीचे हवाईचित्रण केलेली दृश्ये काळजाला हात घालतात. चोहोबाजुंनी पाण्यानं वेढलंल गाव पाहाताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
7 / 12
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली.
8 / 12
मुख्यमंत्र्यांसह कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदांमत्री गिरीश महाजन यांनीही कोल्हापूरचा पाहणी दौरा केला.
9 / 12
राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाणार असून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
10 / 12
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पूरस्थितीचा आढावा घेत, बचावकार्य आणि मदत वेगाने पुरविण्याचे आश्वासन दिले आहे.
11 / 12
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्नी शैलेजा पाटील पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी जेवनाची व्यवस्था करत आहेत. त्यासाठी त्यांनी खुद्द स्वयंपाकगृहाची सुत्रे हाती घेतली आहेत.
12 / 12
पुढील तीन दिवस कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सैन्यदल तळ ठोकून या जिल्ह्यात मदत आणि बचावकार्य करत आहे.
टॅग्स :floodपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर