शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:56 PM

1 / 18
‘दख्खनचा राजा’श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा येत्या शनिवारी होत आहे. देवाच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्र, कर्नाटकासह कानाकोपºयांतील भाविकांची पावले आता डोंगराच्या दिशेने वळू लागली आहेत. यात्रेला बैलगाडीतून जाण्याची परंपरा आजही जोपासली जात असून कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर या यात्रेकरूंचा मुक्काम असतो. हे यात्रेकरू सोमवारी श्री जोतिबाची पूजा करत होते. (छाया : दीपक जाधव )
2 / 18
कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर यात्रेकरूंचा मुक्काम असतो. हे यात्रेकरू श्री जोतिबाची पूजा करत होते. पंचगंगा नदीला नैवेद्य देताना. (छाया : दीपक जाधव )
3 / 18
पूजेसाठी ठेवण्यात आलेली श्री जोतिबाची मूर्ती. (छाया : दीपक जाधव )
4 / 18
विसाव्यासाठी थांबलेल्या गाड्या.(छाया : दीपक जाधव )
5 / 18
नदी पूजन करताना यात्रेकरू.(छाया : दीपक जाधव )
6 / 18
पूजेनंतर सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.(छाया : दीपक जाधव )
7 / 18
पूजेसाठी पेटवलेली दिवटी.(छाया : दीपक जाधव )
8 / 18
जोतिबा यात्रेसाठी बेळगाव नार्वेकर गली मधील भाविक वडणगे-निगवे मार्गावरून मार्गस्थ झालेल्या बैलगाड्या. (छाया : दीपक जाधव )
9 / 18
जोतिबा यात्रेसाठी बेळगाव नार्वेकर गली मधील भाविक वडणगे-निगवे मार्गावरून मार्गस्थ झालेल्या बैलगाड्या. (छाया : दीपक जाधव )
10 / 18
जोतिबा यात्रेसाठी बेळगाव नार्वेकर गली मधील भाविक वडणगे-निगवे मार्गावरून मार्गस्थ झालेल्या बैलगाड्या. (छाया : दीपक जाधव )
11 / 18
जोतिबा येथील चैत्र यात्रेला मंगळवारी कामदा एकादशी पासून सुरुवात झाली. यानिमित्त जोतिबाची विठ्ठल रूपात बांधण्यात आलेली पूजा ही पूजा विनोद मिटके, तुषार झुगर, केदार शिंगे, रोहन सांगळे, सतीश मिटके व सुमित भिवंदने यांनी बांधली. (छाया : दीपक जाधव )
12 / 18
जोतिबा येथील चैत्र यात्रेला मंगळवारी कामदा एकादशी पासून सुरुवात झाली असून मंदिराच्या दक्षिण दरवाजाला सासन काठी येण्याच्या मार्गावर प्रशासनाच्या वतीने दुभाजक उभारले आहे. यामुळे सासनकाठी आत घेताना गर्दी होणार असून या बाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. (छाया : दीपक जाधव )
13 / 18
जोतिबा येथील चैत्र यात्रेला मंगळवारी कामदा एकादशी पासून सुरुवात झाली. सुर्डी ता. बार्शी येथून पायी आलेली सासनकाठी नाचवताना भाविक. (छाया : दीपक जाधव)
14 / 18
जोतिबा येथील मुख्य मिरवणूक मार्गावरील दुकानाचे अतिक्रमण हटवल्यामुळे मिरवणुक मार्ग मोठा झाला आहे. (छाया : दीपक जाधव )
15 / 18
जोतिबा येथील चैत्र यात्रेला येणारे भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून दगडी फरशीवर कुलकोट आहे. (छाया : दीपक जाधव )
16 / 18
राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केल्यामुळे जोतिबा येथील चैत्र यात्रेत दुकानदारांकडून कापडी पिशवीचा वापर वाढला आहे. (छाया : दीपक जाधव )
17 / 18
जोतिबा येथील चैत्र यात्रेला मंगळवारी कामदा एकादशी पासून सुरुवात झाली असून मंदिराच्या दक्षिण दरवाजाला सासनकाठी येण्याच्या मार्गावर प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढून घेण्यात आले. (छाया : दीपक जाधव )
18 / 18
जोतिबा येथील मंदिर परिसरातील दुकानदारांना अग्निरोधक सिलेंडर घेण्याबाबत प्रांताधिकारी अजय पवार यांनी सूचना दिल्या. (छाया : दीपक जाधव )
टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर