Kolhapur: 11 people have been sentenced to life imprisonment
कोल्हापूर : पाचगाव खूनप्रकरणी ११ जणांना आजन्म कारावास By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 7:50 PM1 / 8कोल्हापूर शहरानजीकच्या पाचगाव ग्रामपंचायत निवडणूक वर्चस्ववादातून पाच वर्षांपूर्वी झालेल्या अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ खून खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालाच्या उत्सुकतेपोटी नागरिकांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रचंड गर्दी केली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)2 / 8अशोक पाटील खून खटल्यातील आरोपींना शिक्षा जाहीर केल्यानंतर पोलिसांनी दिलीप जाधवसह पाचजणांना ताब्यात घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)3 / 8खून प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींना घेऊन जाताना नातेवाईकांनी आक्रोश केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)4 / 8धनाजी गाडगीळ खून खटल्यातील आरोपींना शिक्षा जाहीर केल्यानंतर पोलिसांनी मृत अशोक पाटीलच्या दोन मुलांसह सहा आरोपींना ताब्यात घेतले. (छाया : आदित्य वेल्हाळ)5 / 8कोल्हापूर जिल्हयातील पाचगाव (ता. करवीर) येथील अशोक पाटील व धनाजी गाडगीळ यांच्या खून खटल्याचा निकाल सोमवारी लागला. यामुळे गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावातील मुख्य रस्त्यावर गस्त घातली. (छाया : दीपक जाधव)6 / 8पाचगावमधील मुख्य रस्त्यावर अशी निरव शांतता होती. (छाया : दीपक जाधव)7 / 8पाचगावमधील श्री भैरवनाथ मंदिराजवळ लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त. (छाया : दीपक जाधव)8 / 8पाचगाव ग्रामपंचायतजवळील महादेव मंदिराजवळ करवीर पोलिसांचा बंदोबस्त होता. (छाया : दीपक जाधव) आणखी वाचा Subscribe to Notifications