शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Bandh : कोल्हापुरात जाहीर एल्गार सभेत भगवे वादळ, मराठा बांधवांची तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 7:20 PM

1 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेला मराठा बांधवांची तुडुंब गर्दी.(छाया : आदित्य वेल्हाळ)
2 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेनंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी मराठी गाण्यावर असा ठेका धरला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
3 / 23
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमुळे सार्वजनिक वाहतूक बंद राहिल्याने प्रवाशांना अशी पायपीट करावी लागली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
4 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेसाठी वडणगे (ता. करवीर) येथील मराठा बांधवांनी शिवछत्रपतींची मूर्ती डोक्यावरून घेऊन येत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.(छाया : आदित्य वेल्हाळ)
5 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेपूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त वीरमातांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्टÑगीतासाठी उभारलेले मराठा बांधव.(छाया : आदित्य वेल्हाळ)
6 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेसाठी आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, मालोजीराजे यांच्यासह चंद्रकांत जाधव, लाला गायकवाड, भूषण पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.(छाया : आदित्य वेल्हाळ)
7 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेला महापौर शोभा बोंद्रे यांच्यासह वीर माता उपस्थित होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
8 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेवेळी मराठा तरुणांनी हातातील भगवे झेंडे उंचावून असा जल्लोष केला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
9 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेत शाहू छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठा बांधवांची तुडुंब गर्दी झाली होती.(छाया : आदित्य वेल्हाळ)
10 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेपूर्वी आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त वीरमातांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाहू छत्रपतींसह मान्यवर व मराठा समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
11 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेला जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनीही उपस्थिती लावली. यामध्ये अजित नरके, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेश क्षीरसागर, आ. सत्यजित पाटील-सरुडकर, आदींचा सहभाग राहिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
12 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेला जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनीही उपस्थिती लावली. यामध्ये डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आदी सहभागी झाले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
13 / 23
कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर एल्गार सभेला जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनीही उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. यामध्ये आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील-सरुडकर, वीरेंद्रसिंह मंडलिक, आ. सतेज पाटील, भूषण पाटील, आदींचा सहभाग राहिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
14 / 23
सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील एस.टी.ची वाहतूक गुरुवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मध्यवर्ती बसस्थानक आगारात लावण्यात आलेल्या एस.टी. बसेस.(छाया : नसीर अत्तार)
15 / 23
‘कोल्हापूर बंद’मुळे नेहमी गजबजणारे रंकाळा बसस्थानक गुरुवारी दिवसभर ओस पडले होते.(छाया : नसीर अत्तार)
16 / 23
मराठा आरक्षण आंदोलनातील कोल्हापुरात होणाऱ्या जाहीर सभेसाठी गुरुवारी पार्किंगचे नियोजन नव्हते; पण प्रत्येक सकल मराठा कार्यकर्त्यांने वाहतुकीचा अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग केली. .(छाया : दीपक जाधव)
17 / 23
शाहूपुरीतील गल्लीत रस्त्याकडेला केलेली वाहने पार्किंग..(छाया : दीपक जाधव)
18 / 23
वडणगे फाटा येथे पोलिसांनी वाहने अडवून पेट्रोलपंपावर पार्किंग केल्याने आंदोलकांना पुलावरून पायी चालत शहरात यावे लागले..(छाया : दीपक जाधव)
19 / 23
पन्हाळा मार्गावरून कोल्हापूर शहरात येणारी वाहने वडणगे फाटा येथे पोलिसांनी अडवून तेथेच पेट्रोलपंपावर पार्किंग केली. (छाया : दीपक जाधव)
20 / 23
‘बंद’मुळे नेहमी गजबजणारे कोल्हापूर गुरुवारी दिवसभर ओस पडले होते. (छाया : दीपक जाधव)
21 / 23
‘बंद’मुळे नेहमी गजबजणारे कोल्हापूर गुरुवारी दिवसभर ओस पडले होते. (छाया : दीपक जाधव)
22 / 23
‘बंद’मुळे नेहमी गजबजणारे कोल्हापूर गुरुवारी दिवसभर ओस पडले होते. (छाया : दीपक जाधव)
23 / 23
‘बंद’मुळे नेहमी गजबजणारे कोल्हापूर गुरुवारी दिवसभर ओस पडले होते. (छाया : दीपक जाधव)
टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा