शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापूर शहरात रोड लॉक, थांबा, रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:25 PM

1 / 6
कोल्हापूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागल्याने वाहन चालविताना वाहनधारकाची कसरत होऊन जीव मेटाकुटीला येत आहे. त्यातच अनेक रस्ते पावसाळ्यापूर्वीच्या खुदाईकामासाठी बंद राहिल्याने वाहनधारकांतून वाहतुकीच्या नियोजनाबद्दल संताप व्यक्त होत आहे. त्याबाबत आमचे छायाचित्रकार दीपक जाधव यांनी ‘रस्ता बंद’ची टिपलेली काही छायाचित्रे...
2 / 6
कोल्हापुरातील सुभाष रोडवर सावित्रीबाई फुले रुग्णालयानजीकच्या चौकात रस्ता खुदाई केली आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालय ते गोखले कॉलेज चौक या दुतर्फा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केल्याने टेंबे रोडवर वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडत आहे.  (छाया : दीपक जाधव)
3 / 6
कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या दोन प्रमुख भागांना जोडणाऱ्या बाबूभाई परिख पुलाच्या एका बोगद्यातून एकेरी वाहतूक पुढे सुरू ठेवली आहे; तर राजारामपुरीकडून पुलाकडे येणारी वाहतूक रेल्वे फाटक चौक व परिख पूल या दोन ठिकाणी अडवून गोकुळ हॉटेलमार्गे वळविली आहे; पण पुढे दोन-तीन दिवसांतच वाहनधारकांनी घुसखोरी करीत रेल्वे फाटक आणि परिख पुलाकडील बॅरिकेट्स काढून परिख पुलाच्या एकेरी बोगद्या (वनवे) तून वाहतूक सुरू केली आहे. (छाया : दीपक जाधव)
4 / 6

5 / 6
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय हे तसे वर्दळीचे ठिकाण होय. या परिसरात रस्त्यावर पावसाळ्यात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी व तेथे पाईपलाईन टाकण्यासाठी कार्यालयाच्या समोर रस्त्यावर खुदाई केली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंदे ठेवली आहे. त्यामुळे अन्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत असल्याने संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. (छाया : दीपक जाधव)
6 / 6

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीRainपाऊस