शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोल्हापुरातील शारदीय नवरात्रौत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 8:13 PM

1 / 4
कोल्हापुरातील जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची सिंहावर बसून वनात फलाहार करत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, राजाराम शिंगे, आदिनाथ चिखलकर, विजय बनकर, चंद्रकांत जाधव, सारंग दादर्णे यांनी बांधली.
2 / 4
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील प्राचीन अंबाबाईच्या मूर्तीची पूजा रविवारी करवीरनिवासिनीच्या रूपात महेश जगदाळे, पृथ्वीराज भोसले,अमृत चरणकर यांनी बांधली. देवी अंबाबाई सेवा मंडळामार्फत पन्हाळा येथील अंबाबाई मंदिरात सकाळी अभिषेक, सायंकाळी महिला मंडळामार्फत भजन, जोगवा असे विविध कार्यक्रम रोज होत आहेत. नीळकंठ मोघे यांनी पौराहित्य केले. पन्हाळा येथील कर्तव्य फाउंडेशनमार्फत रविवारी फुलांची आरास मांडली होती. पन्हाळा येथील हे अंबाबाईचे मंदिर प्राचीन आहे. करवीर महात्मात या मंदिराचा उल्लेख आहे. ही अंबाबाई चतुर्भुजा विष्णू रूपात आहे. डाव्या हातात सुदर्शन आणि पानपत्र, उजव्या हातात गदा आणि म्हाळुंग, डोक्यावर शेषमुकूट आणि महादेवाची पिंडी आहे. सिंह वाहन असून देवीच्या गळ्यात विष्णू प्रतिमा आहे. विशेष म्हणजे देवीची मूळ मूर्ती अजूनही काळ्या फत्तरातील अभंग आहे. पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष मदनमोहन लोहिया यांनी या मंदिराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार केला.
3 / 4
कात्यायनी देवीची नवरात्रौत्सवानिमित्त चौथ्या दिवशी रविवारी सिंहासनरूढ पूजा बांधण्यात आली होती.
4 / 4
कोल्हापुरात शारदीय नवरात्रौत्सवाच्या चतुर्थीला रविवारी नवदुर्गावतारातील दुसरी दुर्गा म्हणून संबोधल्या जाणाºया मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रमच्या मुक्तांबिका देवी(गजेंद्रलक्ष्मी)ची पूजा पुजारी वैभव माने यांनी माहेश्वरी रूपात बांधली होती. (छाया : नसीर अत्तार)