killari earthquake : 25 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणींनी आजही महाराष्ट्र हादरतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 12:47 IST
1 / 6आजपासून ठिक 25 वर्षांपूर्वी लातूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या आठवणीने आजही महाराष्ट्र हादरतो. आजही 30 सप्टेंबर 1993च्या पहाटेचा विचारही लातूरकरांच्या काळजाचा ठोका चुकवतो. 2 / 61993मध्ये 30 सप्टेंबरला लातूरमधील किल्लारीत झालेल्या भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त झालं होतं. यामध्ये 10 हजार लोक मृत्यूमुखी पडली होती तर जवळपास 30 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. 3 / 629 सप्टेंबर 1993च्या अनंतर चतुर्दशीच्या दिवशी विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देऊन संपूर्ण गाव झोपेत असताना पहाटे तीन वाजून 56 मिनिटांनी भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 6.03 रिश्टर स्केल्या धक्क्यांनी अनेक गावं जमिनदोस्त झाली.4 / 6किल्लारीमध्ये झालेला भूकंप म्हणजे भारतातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. तर राज्यातील सर्वात मोठा नैसर्गिक प्रकोप होता. 5 / 6आजही या दिवसाच्या जखमा अजून भरून निघालेल्या नाहीत. त्यामुळे या दिवशी संपूर्ण गावामध्ये बंद पाळण्यात येतो. 6 / 6या भूकंपामुळे 52 गावं जमिनदोस्त झाली होती. आजही या दिवसाच्या आठवणींनी गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो.