Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ritesh Deshmukh criticized on mahayuti government
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:45 PM1 / 10Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यात यावेळी मोठ्या लढती होत आहेत. काँग्रेसकडून माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख निवडणूक लढवत आहेत.2 / 10दरम्यान, आता त्यांच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरले आहेत. देशमुख यांनी काल लातूरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला. यावेळी त्यांनी महागाई, महिला सुरक्षेवरुन महायुती सरकारवर टीका केली.3 / 10अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या भावांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काल लातूरमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळ त्यांनी सभेत बोलतनाता महायुती सरकारवर टीका केली.4 / 10यावेळी सभेत बोलताना रितेश देशमुख म्हणाले, जनतेचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे ही मोठी गोष्ट आहे. यासोबतच काँग्रेस आमच्या रक्तात असून आम्ही काँग्रेसशिवाय कुठेही जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.5 / 10यावेळी देशमुख यांनी महायुती सरकारवर टीकाही केली. रितेश देशमुख म्हणाले, लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी धिरज देशमुख यांनी पेलली आहे. गेली पाच वर्षे त्यांनी काम केले आहे. लोकसभेला जे वार होते तेच वातावरण आता आहे. समोर गुलिगत धोका आहे, त्या धोक्याला बळी पडू नका, असा टोलाही विरोधकांना देशमुख यांनी लगावला. 6 / 10रितेश देशमुख म्हणाले, कृष्ण म्हणाले होते की 'कर्म हाच धर्म आहे', काम करत राहणे म्हणजेच कर्म करणे, कर्म करत राहणे म्हणजे धर्म करत राहणे. जो काम करतो प्रमाणिकपणे त्याला खरच धर्म केल्यासारखे वाटते. पण जे काम करत नाहीत त्यांना धर्माची गरज पडते. सगळे म्हणतात धर्म धोक्यात आहे. प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्माला वाचवा, धर्म बचाव. अहो आमचा धर्म आहे, आम्हाल प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. जे लोक तुम्हाला म्हणत आहेत की, धर्म बचाव. जो पक्ष म्हणतो धर्म बचाव, धर्म धोक्यात आहे. खर म्हणजे ते धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा, असा टोलाही रितेश देशमुख यांनी महायुतीला लगावला. 7 / 10'भुल थापांना बळी पडण्याची काही गरज नाही. त्यांना पहिलं म्हणा धर्माचे आम्ही बघून घेतो, आमच्या कामाच तुम्ही सांगा, धर्माचं बघून घेतो तुम्ही आमच्या पीक पाण्याला काय भाव देता ते सांगा. धर्माचं आम्ही बघून घेतो पण आमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत की नाही ते सांगा, असा निशाणाही अभिनेता रितेश देशमुख यांनी महायुतीवर साधला. 8 / 10लातूर ग्रामीणमधून काँग्रेसच्या तिकिटावर धिरज देशमुख दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. धिरज यांनी २०१९ मध्ये लातूर ग्रामीणमधून काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा १.२१ लाख मतांनी पराभव केला. 9 / 10लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धिरज देशमुख यांच्या विरोधात भाजपाने रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. रमेश कराड गेल्या अनेक वर्षापासून लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, मात्र सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 10 / 10धिरज देशमुख यांचे मोठे बंधू अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित देशमुख यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती त्यांनी यावेळी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकली.आता चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications