candies that will take you back to your childhood
'हे' चॉकलेट्स जागवतील बालपणीच्या आठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 4:06 PM1 / 8चॉकलेट ही सर्वांच्याच आवडीची गोष्ट. हल्ली 1 रुपयांपासून ते अगदी 1000 रुपयांपेक्षाही जास्त किंमतीची चॉकलेट बाजारात उपलब्ध आहेत. मात्र अशी काही चॉकलेट्स आहेत ज्यांना पाहिल्यावर बालपणींच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळेल.2 / 8मॅगो बाईट हे चॉकलेट आताही साधारण 1 रुपयाला बाजारात मिळते. मात्र एक काळ असा होता जेव्हा फक्त बेस्ट फ्रेंडलाच हे चॉकलेट दिले जात असे. 3 / 8किसमी या चॉकलेटची क्रेझ आताही प्रचंड आहे. सुरुवातीला 25 पैशाला मिळणार हे चॉकलेट आता एक रुपयाला मिळतं. 4 / 8पान पसंद या चॉकलेटला गोड पानाची चव असल्याने पान खाण्याऐवजी अनेकजण आताही हे चॉकलेट खाणं अधिक पसंत करतात.5 / 8रोला-ए-कोला ही गोळी कोको कोला या सॉफ्ट ड्रिंकसारखी लागत असल्याने सगळ्यांनाच आवडायची.6 / 8पॉपीन्स या नावातच सगळी गंमत होती. टीव्हीवर येणारी पॉपीन्सची जाहिरात आजही सर्वांच्या लक्षात आहे. वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या लहान मुलांना प्रचंड आवडायच्या.7 / 8बीग बबूलची जाहिरात तर कोणीच विसरू शकत नाही. एक काळ असा होता की प्रत्येकालाच हे चॉकलेट हवं असायचं.8 / 8पेप्सी ही सर्वच लहान मुलांच्या अत्यंत आवडीची गोष्ट. पेप्सीचा थंडावा आणि वेगवेगळे रंग हे लहान मुलांचं लक्ष वेधून घेतात. आणखी वाचा Subscribe to Notifications