शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पाच गोष्टी लग्नानंतर चुकूनही लगेच करु नका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 7:31 PM

1 / 5
लग्नामध्ये झालेल्या खर्चाला मुद्दा बनवू नका. लग्नामध्ये झालेल्या खर्चाचा विषय वारंवार उपस्थित करुन त्यावरुन वाद निर्माण होईल अशी स्थिती उत्पन्न करु नका.
2 / 5
लग्नानंतर नातेवाईकांना विनोदाचा विषय बनवणे टाळा. मुलाने मुलीला तिच्या नातेवाईकांवरुन टोमणे मारु नये तसेच मुलीनेही मुलाच्या घरच्यांवरुन कोणतीही आपत्तीजनक प्रतिक्रिया देऊ नये. अन्यथा मोठा वाद अटळ आहे.
3 / 5
नवरा-बायको दोघांनीही पूर्व प्रियकर किंवा पूर्व प्रेयसीशी तुलना करु नये. तुमचे नवीन लग्न झालेले असताना लगेचच अशा प्रकारची तुलना करणे घातक ठरु शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात त्यामुळे वादळ येऊ शकते.
4 / 5
लग्नातल्या एखाद्या घटनेवरुन पत्नीने पतीला त्याच्या मित्रपिरवारावरुन सुनावणे किंवा पतीने पत्नीला तिच्या मैत्रिणींवरुन बोलण्यामुळे अहंकार दुखावला जातो आणि विनाकारण भांडण सुरु होते.
5 / 5
लग्नानंतर अनेकदा मुली ते तुझे काम आहे त्यामुळे तूच कर असे मुलांना सांगतात. खरतर ज्याच काम आहे त्यानेच केलं पाहिजे त्यात काहीही चुकीच नाही पण आता तुम्ही पती-पत्नी आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचं आहे. परस्परांना मदत केल्याशिवाय पुढचा प्रवास कठिण होऊ शकतो. त्यामुळे कोणाच काम आहे यापेक्षा दोघांनीही एकमेकांना त्या कामात मदत करण जास्त महत्वाच आहे.