follow these simple tips to stay happy in office
ऑफिसमध्ये आनंदी राहायचंय? 'या' टिप्स फॉलो करा By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 11:10 PM1 / 6सहकाऱ्यांना कनेक्ट व्हा- ऑफिसमध्ये तुम्ही टीम म्हणून काम करता. तुम्ही एकटे कधीही एकटे एखादं काम पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे केवळ प्रोफेशनल नातं जपण्यापेक्षा सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. 2 / 6स्वत:च्या खासगी समस्या दूर ठेवा- प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. कुटुंब, मित्र परिवार, नातेसंबंधांमध्ये अडचणी येत असतात. याचा परिणाम तुमच्या कामावर होणार नाही, याची काळजी घ्या. 3 / 6टाळाटाळ करू नका- काम करताना उद्यावर जास्त अवलंबून राहू नका. कामात टाळाटाळ करू नका. ऑफिसमध्ये आनंदी राहायचं असल्यास ते उद्यावर ढकलत राहू नका.4 / 6सकारात्मक वृत्ती ठेवा- सकारात्मक वृत्ती ठेवल्याचा मोठा फायदा तुम्हाला ऑफिसमध्ये होईल. यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये आनंदी राहू शकाल.5 / 6वाद टाळा- टीमसोबत काम करणं आव्हानात्मक असतं. कारण विविध स्वभावाच्या व्यक्तींना सांभाळून काम करणं सोपं नसतं. त्यामुळे संवाद ठेवा. वाद टाळा. सर्वांची मतं विचारात घ्या. निर्णय घेताना सर्वांच्या मतांचा विचार करा.6 / 6नवी आव्हानं स्वीकारा- नवीन आव्हानं स्वीकारण्यापासून मागे हटू नका. जिथे नवी आव्हानं स्वीकारायला मिळतात, अशाच ठिकाणी काम करा. त्यामुळे तुम्ही प्रगल्भ होता. आणखी वाचा Subscribe to Notifications