By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:03 IST
1 / 9सकाळी लवकर उठा- कोर्ले रिसर्चनुसार, स्वत:च्या मेहनतीनं कोट्यधीश झालेल्या निम्म्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात. तुमचा दिवस सुरू होण्याच्या किमान तीन तास उठून तो वेळ वैयक्तिक कामं पूर्ण करण्यासाठी, नियोजनासाठी, व्यायामासाठी द्या. 2 / 9वाचन वाढवा- यशस्वी व्यक्ती दिवसातील किमान 30 मिनिटं वाचनासाठी देतात, असं कोर्लेचा संशोधन अहवाल सांगतो. स्वत:ला अपडेट ठेवण्यात, वैचारिकदृष्ट्या समृद्ध ठेवण्यात वाचन महत्त्वाची कामगिरी पार पाडतं. 3 / 915 मिनिटं लक्ष केंद्रीत करुन विचार करा- एकाग्र चित्त होऊन किमान 15 मिनिटं विचार करणं अतिशय फायदेशीर ठरतं. तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या घटनांचा 15 मिनिटं व्यवस्थित लक्ष देऊन विचार केल्यानं बराच फरक पडतो. ही वेळ सकाळची असल्यास अतिशय उत्तम.4 / 9नियमित व्यायाम- नियमित व्यायाम केल्यानं तुम्ही कायम ताजेतवाने राहता. दिवसातील 30 मिनिटं जॉगिंग, बायकिंग, वॉकिंग केल्यास ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं.5 / 9प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास- तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या कायम संपर्कात राहा. अशा व्यक्ती तुमच्या निकटच्या वर्तुळात नसतील, तर जाणीवपूर्वक अशा व्यक्तींचा सहवास लाभेल अशा दृष्टीनं प्रयत्न करा. 6 / 9ध्येय, नियोजन आणि अंमलबजावणी- यशस्वी व्यक्ती दोन टप्प्यांमध्ये त्यांची ध्येयं निश्चित करतात. दीर्घ आणि लघू काळासाठी त्यांची योजना तयार असते. या दोन्ही टप्प्यातील ध्येय पूर्ण करण्यासाठी ते अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देतात. 7 / 9पुरेशी झोप- रात्री किमान आठ ते तास झोपा. तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यास ते दिवसभर उत्तम साथ देतं. 8 / 9एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका- यशस्वी व्हायचं असल्यास कधीही एका मार्गानं येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहू नका. तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारे विविध पर्याय शोधा. त्यामुळे एक मार्ग बंद झाल्यास तुमचं उत्पन्न बंद होणार नाही. 9 / 9वेळ वाया घालवू नका- वेळ वाया घालवणाऱ्या सवयी आणि माणसांपासून दूर राहा. यशस्वी व्हायचं असल्यास वेळ सत्कारणी लावण्याची सवय स्वत:ला लावा. तुमच्याकडे असणारा वेळ सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा.