he likes you or not know from zodiac signs
राशीवरुन ओळखा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही? By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 3:57 PM1 / 12मेष राशीच्या स्वभावाची मुलं सरळ मार्गी चालणारे, मात्र हट्टीदेखील असतात. प्रेम प्रकरणामध्ये प्रामाणिक असतात. प्रेम खरं असेल तर ते व्यक्तदेखील करतात. 2 / 12वृषभ राशीची मुलं प्रेम प्रकरणात गंभीर असतात. या राशीच्या मुलांना प्रेम झाल्यास जास्तीत जास्त वेळ आपल्या साथीदारासोबत घालवणं पसंत करतात.3 / 12मिथुन राशीच्या मुलांना प्रेमामध्ये टाइमपास करणं पसंत नसते. प्रेम खरं असेल तर आपल्या पार्टनरच्या आसपासच राहणं त्यांना आवडतं.4 / 12कर्क राशीची मुलं स्वभावानं भावनिक असतात. प्रेमामध्ये जर एखादी व्यक्ती त्यांचा विश्वास संपादन करण्यास यशस्वी झाली तर त्या व्यकीची साथ ते शेवटपर्यंत सोडत नाहीत. 5 / 12सिंह राशीची मुलं साथीदारासोबत एकनिष्ठ राहणारी असतात. यांना खरं प्रेम झाल्यास याबाबत संपूर्ण जगाला ओरडून सांगण्यास त्यांना भीती वाटत नाही. 6 / 12कन्या राशीची मुलं थोडीशी लाजरी असतात. जर कोणामध्ये ते आवड दाखवत असतील तर त्यांच्या मनात भावना आहेत, हे समजून जावे.7 / 12तूळ राशीची मुलं प्रेमात रोमँटिक आणि साथीदाराच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेणारे असतात. 8 / 12वृश्चिक राशीची मुलं सत्य आणि खुल्या विचारांचे समर्थन करणारी असतात. प्रेम व्यक्त करण्यात संकोच वाटत नाही. मनमोकळेपणानं प्रेम करतात.9 / 12धनु राशीच्या मुलांना नात्यामध्ये स्वातंत्र्य देणे-घेणे पसंत असते. 10 / 12मकर राशीची मुलं सहजासहजी कोणाकडेही आकर्षिक होत नाहीत. एखादी व्यक्ती आवडत असल्यासच बोलणी वाढवतील अथवा जेवढ्यास तेवढीच बोलणी करतील. 11 / 12कुंभ राशीच्या मुलांचा स्वभाव थोडासा रहस्यमय असतो. सुरुवातीला अगदीच मनमोकळेपणानं ते बोलत नाही. पण जर कुणी आवडत असेल तर त्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी ते संधी शोधत असतात. 12 / 12मीन राशीची मुलं अत्यंत रोमँटिक असतात. लवकर कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. ज्या कोणावरही प्रेम करतात त्यांच्यावर डोळे बंद ठेऊन विश्वास ठेवतात. आणखी वाचा Subscribe to Notifications