home cleaning tips with used tea bags
थांबा ! वापरलेल्या टी बॅग्स फेकून देता?, असा करा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 6:29 PM1 / 51. फ्रिजमधील दुर्गंधी घालवा : फ्रिजची नियमित स्वच्छता होत नसल्यानं काही दिवसांनी फ्रिजमध्ये वास येऊ लागते. उग्र वास दूर करण्यासाठी टी-बॅगची चांगली मदत होते. वापर केलेली टी-बॅग फेकण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. यामुळे दुर्गंधी येणार नाही. 2 / 52. नैसर्गिक माऊथफ्रेशनर : ग्रीन टी किंवा पेपरमिंटसारख्या बॅग्सपासून तुम्ही नैसर्गिक माऊथफ्रेशनरही बनवू शकता. यासाठी टी बॅग्स गरम पाण्यात भिजवून थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमचे नैसर्गिक माऊथफ्रेशनर झाले तयार. 3 / 53. काचांची सफाई : काचांवर कोणत्याही प्रकारचे डाग पडले असल्यास, टी बॅगनं काच स्वच्छ करा. टी बॅगच्या मदतीनं खिडकी, ड्रेसिंग टेबलच्या काचा हलक्या हातांनी स्वच्छ करा. 4 / 54. घरातून उदरांना पळवा : उंदीर घरामध्ये दुर्गंधी पसरवण्यासहीत साहित्यांची नासाडी करतात. नासधूस करणाऱ्या या उंदरांचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी टी बॅगची मदत घ्या. टी बॅगवर पेपरमिंट ऑईलचे काही थेंब शिंपडा आणि ज्या ठिकाणी उंदीर, कोळी, मुंग्याचा वावर जास्त आहे, तेथे हे टी बॅग ठेऊन द्या. 5 / 55. लाकडी फर्निचर आणि जमिनीची सफाई : लाकडी फर्निचर आणि जमिनीला चमकवायची आहे?, मग टी बॅग पाण्यात गरम करावी आणि नंतर थंड होऊ द्यावी. टी बॅग असलेल्या पाण्यानं मऊ कापडाच्या मदतीनं फर्निचर आणि जमिनीची सफाई करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications