In these beautiful place if you propose your girlfriend, then she will say yes
'या' सुंदर ठिकाणी गर्लफ्रेंडला प्रपोज केलंत, तर सारं काही जिंकलंत By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 3:53 PM1 / 4काश्मीर : काश्मीर हे निसर्ग सौंदर्यतेने नटलेलं आहे. काश्मीरमधील सर्वात रोमँटीक जागा म्हणजे डल लेक. जवळपास एक शहरंच या मोठ्या तलावामध्ये वसलेलं आहे. मिशन कश्मीर मधलं 'चुपके से सुन' हे गाण गाऊन तुम्ही तिला डल लेकमधील शिकाऱ्यामध्ये प्रपोज केलं, तर तुम्हाला गर्लफ्रेंड नाही बोलू शकणार नाही.2 / 4शिमला : बर्फाचा पाऊस, हा तर आपल्यासाठी कुतुहलाचा विषय. त्यासाठी तुम्हाला जावं लागेल ते शिमला येथे. मस्त बर्फ पडत असताना तुम्ही गर्लफ्रेंडला प्रपोज केलं, तर या रोमँटीक वातावरणात ती तुम्हाला नाही म्हणणार नाही.3 / 4लोणावळा : महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून लोणावळा प्रसिद्ध आहे. लोणावळ्याला हॉट एयर बलूनची सफर करण्यासाठी तुम्ही गर्लफ्रेंडला घेऊन जाऊ शकता. या हॉट एयर बलूनमध्ये निसर्गाचा आनंद लुटताना तुम्ही गर्लफ्रेंडला प्रपोज करू शकता.4 / 4अंदमान आणि निकोबार : भारतामध्ये अंदमान आणि निकोबार या बेटांचे आकर्षण सर्वांनाच आहे. या ठिकाणी स्कूबा डायव्हिंगही चांगली केली जाते. समुद्रखाली जाऊन प्रपोज करण्याचा अनोखा फंडा तुम्ही येथे वापरू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications