शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० कोटींचे दागिने, शंभर वर्षांचा इतिहास; कडक बंदोबस्तात सजतात 'राधा-कृष्ण'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 7:11 PM

1 / 10
देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत असून पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सवही जोरात सुरू आहे.
2 / 10
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील फूलबागेत राजकालीन ऐतिहासिक गोपाळ मंदिर आहे. या मंदिरातील श्रीकृष्ण आणि राधेच्या मूर्तीला आज कोट्यवधींच्या दागिन्यांचा शृंगार केला जातो.
3 / 10
मोठ्या बंदोबस्तात जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीतून हे दागिने मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर, प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मूर्तींना दागिन्यांनी सजवण्यात आले.
4 / 10
आजच्यादिवशी हे मंदिर सर्वच नागरिकांसाठी व भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात असून सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहे.
5 / 10
येथील फूल बागेत यंदाही दरवर्षीप्रमाणे गोकुळ जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंदिरातील श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्तीला दागिन्यांनी सजवण्यात आले असून हे दागिने सोने आणि हिरे व माणिक-मोत्यांनी बनवल्याले आहेत.
6 / 10
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून हे दागिने सुरक्षा व्यवस्थेसह मंदिरात आणण्यात आले. राजे महाराजांच्या काळातील हे अँटीक दागिने आहेत.
7 / 10
ग्वालियरच्या सिंधिया राजघराण्यापासून हे दागिने आहेत. तर, १०० वर्षांहून जास्त वर्षांचे हे राधा-कृष्ण मंदिर आहे. येथील दागिन्यांची किंमत सव्वाशे कोटी असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास १०२ वर्षांपूर्वी सिंधिया राजघराण्यातील माधवराव सिंधीया या राजांनी या मंदिराची स्थापन केली होती. तेव्हाच हे दागिनेही रत्न, माणिक व मोत्यांनी बनवलेले आहेत.
8 / 10
जवळपास १०२ वर्षांपूर्वी सिंधिया राजघराण्यातील माधवराव सिंधीया या राजांनी या मंदिराची स्थापन केली होती. तेव्हाच हे दागिनेही रत्न, माणिक व मोत्यांनी बनवलेले आहेत.
9 / 10
मंदिरातील मूर्तींना या दागिन्यांनी सजवल्यानंतर राधा-कृष्णाचं हे मनमोहक रुप पाहायला अनेक भाविक गर्दी करतात. श्रीकृष्णाच्या हाती सोन्याची बासरी आहे.
10 / 10
५५ पानांच्या ७ मांळेचा हार, माणिक, मोत्यांनी सजलेली सोन्याची बासरी, सोन्याची नथ, जंजीर व चांदीचे पूजा थाळी आहेत. दरवर्षी गोकुळ जन्माष्टमीला मंदिरातील मूर्तींना दागिन्यांनी सजवले जाते.
टॅग्स :GoldसोनंMadhya Pradeshमध्य प्रदेशRadha Krishna Serialराधा कृष्णgwalior-pcग्वालियर