शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jyotiraditya Scindia : ज्योतिरादित्य शिंदेंची संपत्ती पाहून तुम्हीही व्हाल थक्क, बँकेचे कर्जही आहे 'इतके'!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 9:11 AM

1 / 8
भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे गुना मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गुना मतदारसंघातून आपले नशीब आजमावत असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, पण त्यांच्यावर बँकेचे कर्जही आहे.
2 / 8
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे यांच्यावरही बँकेचे कर्ज आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे फक्त २५,००० रुपये रोख आहेत तर त्यांच्या पत्नीकडे फक्त २०,००० रुपये आहेत. तसेच, शिंदे यांची मुलगी अनन्या राजे हिच्याकडे फक्त ५,००० रोख आहेत.
3 / 8
भाजपा उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुना लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जासोबतच त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही दिले आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपली मालमत्ता आणि इतर माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.
4 / 8
प्रतिज्ञापत्रानुसार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ४ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नीकडे १४ लाख १८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. अशाप्रकारे त्यांच्याकडे अविवाहित हिंदू कुटुंबानुसार, जवळपास ५६ कोटी २९ लाख ५७ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून त्यांची मुलगी अनन्या हिच्या नावावर १ कोटी ४९ लाख ३७ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
5 / 8
अशा प्रकारे जर पाहिले तर शिंदे कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा आकडा ६१ कोटी रुपयांच्या वर पोहोचेल.याचबरोबर, स्थावर मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर शिंदे कुटुंबाकडे ३२६ कोटी रुपयांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे.
6 / 8
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्याकडे ३५ कोटी ५३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, जी निवासी आहे. अशा स्थितीत एकूण आकडा ४२४ कोटींवर पोहोचला आहे. या सगळ्याचा अर्थ असा आहे की, ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
7 / 8
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या वारशाने मिळालेल्या बीएमडब्ल्यू कारचाही उल्लेख केला आहे. १९६० मॉडेलची बीएमडब्ल्यू कार क्रमांक MP 07 W 2255 देखील त्यांच्या जंगम मालमत्तेत समाविष्ट आहे.
8 / 8
याशिवाय, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर ४७,५०,००० रुपयांचे बँकेचे कर्ज असल्याचीही माहिती आहे. तसेच, त्यांच्या पत्नीवर ७४,००० रुपयांचे कर्ज आहे, तर त्यांच्या मुलीवर कोणतेही कर्ज नाही.
टॅग्स :guna-pcगुनाmadhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेlok sabhaलोकसभा