who is IAS Shailbala Martin who said that loudspeakers on temples cause noise pollution
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल' By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 4:41 PM1 / 9नाना कारणांनी चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. प्रशासनावर त्यांचा असलेला वचक तसेच अधिकारी वर्गातही त्यांचा दबदबा आहे. त्या नेहमी सामाजिक विषयांवर व्यक्त होत असतात.2 / 9आता त्यांनी धार्मिक स्थळांबद्दल बोलताना लाऊडस्पीकरबाबत केलेले विधान चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील डॅशिंग IAS अधिकारी म्हणून शैलबाला यांची ओळख आहे. त्या आधी मध्य प्रदेश राज्य सेवेत अधिकारी होत्या. मग त्यांना २००९ मध्ये बढती मिळाली आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम पाहू लागल्या. 3 / 9शैलबाला मार्टिन या २००९ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांची मध्य प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या वल्लभ भवन येथील सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहेत.4 / 9सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या शैलबाला यांनी आता एक वादग्रस्त पोस्ट केली. प्रत्येक सामाजिक प्रश्नावर त्यांनी मोकळेपणाने भाष्य केले आहे. 5 / 9मशिदीतून आवाज येत असल्याची एकाने पोस्ट केल्यानंतर या पोस्टवर व्यक्त होताना त्यांनी लिहिले की, मंदिरांमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे त्रास होत नाही का?. 6 / 9'मंदिरावरील लाऊडस्पीकरचे काय? या लाऊडस्पीकरमुळेही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. मंदिरांवरील लाऊडस्पीकर मध्यरात्रीपर्यंत वाजतात, तेव्हा कुणाला त्रास होत नाही का?', असे शैलबाला यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.7 / 9शैलबाला मार्टिन या त्यांच्या लग्नामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी मध्य प्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार राकेश पाठक यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यावेळी राकेश पाठक यांचे वय ५८ वर्षे होते. 8 / 9राकेश पाठक यांचे हे दुसरे लग्न होते. तर, शैलबाला मार्टिन वयाच्या ५७ व्या वर्षापर्यंत अविवाहित होत्या. दोघांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या नात्याची माहिती दिली होती.9 / 9९ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेल्या शैलबाला यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. निवाडीच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार सांभाळला. त्यांनी इंदूरच्या होळकर सायन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. याशिवाय मास्टर ऑफ आर्ट्समध्ये त्यांनी एमए केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications