10 lakh insurance from ST bus in one rupee How to get help know more
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 6:07 PM1 / 8एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हिंदुहृदयसम्राट शासनामार्फत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना राबवली जाते. 2 / 8या योजनेंतर्गत अपघातामध्ये मृत व जखमी प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते. त्याकरिता प्रती प्रवासी एक रुपया रक्कम प्रवास भाडे व्यतिरिक्त विमा रक्कम वसूल केली जाते. 3 / 8जमा केलेली ही रक्कम महामंडळाच्या अपघात साहाय्यता निधीमध्ये वर्ग केली जाते.4 / 8एखाद्या बसचा दुर्दैवाने अपघात झाल्यास त्यातील जखमी प्रवासी अथवा मृतांच्या वारसांना या निधीतून साहाय्य दिले जाते. 5 / 8नुकसानभरपाईच्या बाबतीत असे धोरण स्वीकारले जाणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे भारतातील पहिले महामंडळ आहे.6 / 8प्रवाशाला कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास १ ते अडीच लाख रुपये आणि मृत्यू झाल्यास कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत केली जाते. 7 / 8एस.टी. महामंडळ हे सुरक्षित प्रवास करीत आहे. 'सुरक्षित प्रवास' हे महामंडळाचे ब्रीदवाक्य असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रा. प. महामंडळाचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. 8 / 8प्रवाशांना महामंडळाने एक रुपयात विम्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा एसटीचा प्रवासही सुरक्षित झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications