शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 9:47 AM

1 / 10
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. तत्पूर्वी अजित पवारांनी दिल्लीत खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या त्यात सत्तानाट्याचे अनेक किस्से उघड केले आहेत.
2 / 10
राज्यातील सत्तेत सहभागी होताना अजित पवारांनी अमित शाहांसोबत तब्बल १० बैठका केल्या, अनेकदा मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जात होते असा किस्सा अजित पवारांनीच दिल्लीतल्या पत्रकारांना सांगितला. त्याचसोबत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
3 / 10
अजित पवार हे प्रशासनावर पकड असलेले, कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. परंतु सत्तानाट्यावेळी अजित पवारांचे वेगळेच रुप समोर आले. पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी त्यांचे भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचे किस्से सांगितले. मुंबई-दिल्ली, दिल्ली-मुंबई असा त्यांचा प्रवास कसा होता हे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
4 / 10
सत्तानाट्यावेळी अजित पवार हे अमित शाहांसोबत बैठक करायचे, दिल्लीत त्यांच्या या बैठका झाल्या, सामान्य विमानाने ते प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास व्हायचा. त्यांच्या या पेहरावामुळे बाजूला बसलेला माणूसही त्यांना ओळखू शकत नव्हता.
5 / 10
इतकेच नाही तर अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A.A Pawar अशा नावाने ते प्रवास करायचे. याच नावाने त्यांचा बोर्डिंग पास असायचा. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी जवळपास १० बैठका त्यांच्या अमित शाहांसोबत झाल्याचा खुलासाही अजित पवारांनी गप्पांमधून केला. टीव्ही ९ मराठीनं हे वृत्त दिलं आहे.
6 / 10
दरम्यान, अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकांबाबत कुणालाही कल्पना नव्हती. अत्यंत छुप्या रितीने या बैठका व्हायच्या, अजित पवारही दिल्ली-मुंबई प्रवासावेळी त्याची काळजी घ्यायचे, हा सर्व खुलासा अजितदादांनी तटकरेंच्या निवासस्थानी झालेल्या गप्पांमध्ये केला आहे.
7 / 10
अजित पवार हे सध्या दिल्लीत असून त्यांची भाजपा नेत्यांसोबत बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचंही त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
8 / 10
राष्ट्रवादी काँग्रेस सन्मानजनक जागा मागणार असून त्या मिळतील असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला आहे. मात्र अजित पवारांच्या या गप्पांमधून सत्तेत सहभागी होतानाचे वेगळे अजित पवार नेमके कसे होते याचा अनुभव दिल्लीतील पत्रकारांना आला.
9 / 10
जून २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडलं, त्यानंतर भाजपा-शिंदे यांनी सरकार बनवलं. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार आणि त्यांच्यासह दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपासोबत सत्तेत आले.
10 / 10
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सगळेच पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. त्यात महायुती आणि मविआ यांच्यातील जागावाटप चर्चांना वेग आला आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४