शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसटी महामंडळाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा, 150 ‘स्लीपर शिवशाही’ मार्चअखेर एसटीमध्ये दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 23:39 IST

1 / 6
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे.
2 / 6
डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत. ही शिवशाही ३० आसनी असणार आहे.
3 / 6
पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर ही स्लीपर शिवशाही धावणार आहे.
4 / 6
भाडेतत्त्वावर असलेल्या १५० शिवशाही मार्च अखेर रस्त्यावर उतरतील. ‘स्लीपर शिवशाही’मुळे एसटी महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
5 / 6
एसटी महामंडळाची वातानुकूलित आणि अत्याधुनिक ‘ड्रीम एसटी’ म्हणून शिवशाही ओळखली जाते. २ बाय १ अशी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये एकूण ३० प्रवासी एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत.
6 / 6
पूर्ण वातानुकूलित या एसटीला मोबाईल चार्जिंगसह मोबाईल रॅकची सोय देण्यात आली आहे. बैठक आसनी शिवशाहीप्रमाणे सर्व सुविधा या बसमध्ये देखील असणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुरुप चादर आणि उशी महामंडळातर्फे प्रवाशांना पुरवण्यात येणार आहे.
टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ