ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २७ - तेजतर्रार काळीभोर किंवा गर्द लाल रंगाची मिसळ म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण.. मिसळ खायला लागणे हे महाराष्ट्रात तरी ब:याच ठिकाणी आपण तरुण झालो आणि आता स्वतंत्र झालो ह्याची अनाऊन्समेण्ट आहे. मिसळ खाणारा कोणत्याही वयाचा असो, तिची तिखटजाळ चव जेव्हा जीभ जाळते तेव्हा कोणत्याही वयात आपल्यातला रांगडेपणा अजून गेला नाही ह्याची सुखद जाणीव मनाला देत राहते. मिसळीला नुकताखवय्यांचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जाहीर झाला.घराघरांत उसळीत फरसाण, कांदा घालून आणि ब्रेडबरोबर देता येण्याजोगा एक मिसळ वाटावा असा पदार्थ बनतोच. कौटुंबिक दडपणाखाली आपण तो खातोसुद्धा. पण त्याला हॉटेलात मिळणा-या मिसळीचा डौल नाही. आज आपण पाहुया सर्वोत्तम मिसळ मिळणारी महाराष्ट्रातील काही निवडक ठिकाणे :१) मामलेदार मिसळ, ठाणे२) अण्णा बेडेकर, पुणे३) मूनमून मिसळ, डो॑बिवली४) कुंजविहार, ठाणे स्टेशन५) मनशक्ती के॑द्र, लोणावळ६) संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड७) भगवानदास, नाशिक८) प्रकाश, दादर९) फडतरे मिसळ कोल्हापुर१०) मामा काणे, दादर ११) गोखले उपहार गृह, ठाणे१२) काटाकिर्र, गरवारे कॉलेज समोर, पुणे१३) खासबागची मिसळ कोल्हापुर१४) आस्वाद, दादर१५) माधवराव, सातारा १६) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे१७) चोरगे मिसळ, कोल्हापूर१८) सर्वोदय लंच होम, करीरोड पुलाखाली (डिलाइल रोडची बाजू)१९) दत्तकृपा, वडखळ नाका२०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"