2594 Maharashtrians stranded abroad as human beings returned to the state MMG
माणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:48 PM1 / 11 वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. 2 / 11संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. 3 / 11वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या माध्यमातून हे नागरिक महाराष्ट्रात आले असून त्यात ९५५ प्रवासी मुंबईचे आहेत. ११९८ प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत तर ४४१ प्रवासी इतर राज्यांमधील आहेत. 4 / 11आलेले नागरिक हे ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया मधून आले आहेत. अजून १० फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.5 / 11आलेले नागरिक हे ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया मधून आले आहेत. अजून १० फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.6 / 11बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. 7 / 11हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जात आहे.8 / 11महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.9 / 11महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.10 / 11इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. 11 / 11हे वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications