शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NCPचा बडा नेता देशमुख-मलिकांसोबत दिसेल! ‘त्या’ घोटाळ्याची पुन्हा चौकशी; BJPचे नवे लक्ष्य कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 9:11 AM

1 / 10
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार आले. यानंतर अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. तसेच अनेक निर्णयांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने जोरदार धडक कारवाई करत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर मोठे गंभीर आरोप करत घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. आताच्या घडीला अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू असून, पुढचा नंबर अनिल परबांचा असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 10
मात्र, यातच आता भाजपचा आणखी एक नेता सक्रीय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका बड्या नेत्याबाबत सूचक ट्विट करत लवकरच राष्ट्रवादीच्या या नेत्याचा एका जुन्या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या नेत्याने केली आहे. यासह राष्ट्रवादीचा हा बडा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटायला जाईल, असा मोठा दावाही करण्यात आला आहे.
4 / 10
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडण्याची चिन्हे आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खूप मोठी खळबळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा मोहित कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे.
5 / 10
मोहित कंबोज यांनी केलेल्या तीन ट्विटमधून आगामी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशष म्हणजे मोहित यांचं हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरेच तथ्य आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
6 / 10
राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संबंधित नेत्याविषयी तपास यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले.
7 / 10
मोहित कंबोज यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये, ते लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचे म्हटले. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचा इशारा मोहित कंबोज यांनी दिला आहे.
8 / 10
मोहित कंबोज यांनी तिसरे ट्विट करत २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मोहित कंबोज यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
9 / 10
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या प्रमुख विरोधी पक्ष आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न आहे का, अशा चर्चा देखील सुरु आहेत.
10 / 10
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या प्रमुख विरोधी पक्ष आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न आहे का, अशा चर्चा देखील सुरु आहेत.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळBJPभाजपाAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस