धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री?; मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील 'हे' ४ नेते स्पर्धेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:10 IST
1 / 9बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाण आणि हत्येचे अत्यंतर क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली.2 / 9देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय असल्याने या घटनेचा रोष मुंडे यांनाही सहन करावा लागला.3 / 9राज्यभर निर्माण झालेल्या आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला.4 / 9राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.5 / 9मंत्रिमंडळातील गच्छंतीमुळे नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं या निमित्ताने पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे.6 / 9भुजबळ यांच्यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच नेते आणि पाचव्या टर्मचे आमदार प्रकाश सोळंके हेदेखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.7 / 9सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, अशी जाहीर भूमिका प्रकाश सोळंके यांनी घेतली होती.8 / 9एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांना विद्यमान सरकारमध्ये मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याही नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.9 / 9संजय बनसोडे हेदेखील शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र यंदा त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आता मंत्रिपदाची एक जागा रिक्त झाल्यानंतर त्यांच्या नावाचा विचार होतो का, हे पाहावं लागेल.