ऑनलाइन लोकमत - मुंबई, दि. 27 - आजकाल तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी पिणे म्हणजे आऊटडेटेड झालं आहे. फ्रीज आल्यापासून तांब्याच्या भांड्याचा वापर बंदच झाला आहे. शहरांमध्ये तर तांब्याची भांडी कोणाच्या घरात पाहणं दुर्मिळच झालं आहे. तांब्याची भांडी नामशेष होऊ लागली आहेत. कदाचित अनेकांना माहित नसेल पण भारतात फार पूर्वीपासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा आहे. त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास अनेक फायदे होतात जे अनेकांना माहित नसावेत. तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे शरिरासाठी खूपच लाभदायक आहे. नेमके काय फायदे आहेत याची माहिती जाणून घेऊया... 1) रक्त वाढते दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास यामधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करेल. यामुळे अॅनिमियाचा धोका टळतो. 2) सांधेदुखी दूर होतेरोज सकाळ - संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे, यामुळे सांधेदुखीच्या वेदना कमी होतील आणि आराम मिळेल. 3) ह्रदयविकार दूर राहताततांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेले पामी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि ह्रदय मजबूत होते. 4) जखम ठीक होतेतांब्यामध्ये असलेले अँटी-बँक्टेरियल गुण जखम लवकर ठीक करण्यास मदत करतात. एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. 5) थायरॉइडलवकर वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे ही थायरॉइडची प्रमुक लक्षणे आहेत. तांब्यामधील कॉपर थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते. यामुळे थायरॉइडचा धोका दूर होतो. 6) कॅन्सरचा धोका कमी होतोतांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स पर्याप्त प्रमाणात असतात, जे कॅन्सरशी लढण्यात सहायक ठरतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी राहतो. 7) पाचन क्रिया व्यवस्थित राहतेअॅसिडिटी,गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. आयुर्वेदानुसार जर तुम्हाला शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्याची इच्छा असेल तर तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे पाचन क्रिया व्यवस्थित राहते. 8) नेहमी तरुण दिसण्यासाठीतांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन (मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.