संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते. - माजी संमेलनाध्यक्ष फय्याजबालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी यांचा विचार केला तर प्रायोगिक रंगभूमी अधिक सक्षम होत असल्याचं जाणवतंय. त्याला कारण महाराष्ट्र राज्य गेली पच्चावन्न वर्षे राज्य स्तरावर घेत असलेल्या नाट्यस्पर्धा. - अध्यक्ष गंगाराम गवाणकरनाटक ही मराठी माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी म्हणायचे की दारू ही प्यायच्या अगोदर सुटते! नाटक धंदासुद्धा असाच आहे. या धंद्यात एकदा का माणूस उतरला की रंगभूमीकडे त्याची पावले वळणारच. - अध्यक्ष गंगाराम गवाणकरअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९६व्या नाट्यसंमेलनाच्या दुस-या दिवशी घुमले महेश काळेंचे सूर निरागस हो चे सूर. (सर्व छायाचित्रे - विशाल हळदे)