शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील बलाढ्य कंपनी राज्यात येणार? आदित्य ठाकरेंकडून तयारी सुरू

By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 5:21 PM

1 / 9
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी जगप्रसिद्ध कंपनीला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील मिळताना दिसत आहे.
2 / 9
आदित्य ठाकरेंनी इलॉन मस्क यांना राज्यात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. ठाकरेंच्या आमंत्रणाला मस्क यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
3 / 9
इलॉन मस्क इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे संस्थापक आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची माहिती आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून दिली आहे.
4 / 9
टेस्लाला महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मस्क यांच्यासोबत बातचीत केल्याचं आदित्य ठाकरेंनी ट्विट करून सांगितलं आहे.
5 / 9
राज्य सरकार सातत्यानं विकासासाठी काम करत असल्याचं ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
6 / 9
आदित्य ठाकरेंच्या ट्विटला मस्क यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे टेस्ला लवकरच राज्यात येण्याची शक्यता आहे.
7 / 9
मस्क यांनी ट्विटसोबत एक टी-शर्टचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्यावर 'इंडिया वाँट्स टेस्ला' असं लिहिलं आहे. यासोबतच टेस्ला यांनी आभारदेखील मानले आहे.
8 / 9
टेस्ला २०२१ मध्ये भारतात दाखल होईल, असे संकेत कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी आधीच दिले आहेत.
9 / 9
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवण्याचं धोरण मोदी सरकारकडून आखलं जात आहे. त्यामुळे टेस्लाला भारतात मोठी संधी आहे.
टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे