शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aditya Thackeray: "33 देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतलीय"; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 2:38 PM

1 / 10
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. भाजपसोबत एकत्र येत एकनाथ शिंद आणि त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे.
2 / 10
दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aadiपtya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. आपल्या दौऱ्यात बेकायदेशीर सरकार आणि बंडखोर आमदारांवर आदित्य तोफ डागताना दिसून येतात.
3 / 10
आदित्य यांच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून शिवसैनिक गर्दी करत आहेत. या गर्दीसमोर आदित्य ठाकरे सातत्याने बंडखोरआमदारांचा उल्लेख गद्दार असाच करत आहेत. त्यावरुन, शिंदे गटातील आमदारही नाराज आहेत.
4 / 10
शिवसेना म्हणून एकही शिवसैनिक राहिला नाही. आदित्य ठाकरेंची शेवटची धडपड सुरू आहे. कोण आदित्य ठाकरे? काय संबंध? आदित्य ठाकरे हा एक आमदार आहे यापेक्षा फारसं महत्त्व देत नाही, अशा शब्दात शिंदेगटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.
5 / 10
कोल्हापुरात झालेल्या सभेतूनही आदित्य यांनी बंडखोरांवर गद्दार म्हणत निशाना साधला. ते कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी बंडखोरांवर तोफ डागली. यावेळी त्यांना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष करत सावंतांवर बोलणं टाळलं.
6 / 10
कोल्हापूर नंतर पुण्यातील कात्रज येथे आदित्य ठाकरेंची सभा झाली. या सभेनंतर गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी, आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही अज्ञांनी दगडफेक करत त्यांना गद्दार म्हटल्याचा व्हिडिओही समोर आला होता.
7 / 10
पुण्यानंतर आदित्य ठाकरेंनी माहिम मतदारसंघात शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळीही, बंडखोरांना लक्ष्य केलं. लाजा नसल्यावानी ते सांगतात 33 देशांनी आमची नोंद घेतली. पण, 33 देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली, अशा शब्दात आदित्य यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर तोफ डागली
8 / 10
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनीही आदित्य यांना सुनावलं आहे. सध्या अमित ठाकरे यांनीही दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत मनसेला उभारी देण्याचं काम अमित ठाकरे करताना दिसून येतात. याचदरम्यान, त्यांनी आदित्य ठाकरेंना सवाल केला आहे.
9 / 10
दरम्यान, शिवसेना ऐतिहासिक संकटात असून, आदित्य ठाकरे यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. यावर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचे बंड झाले नसते तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे
10 / 10
आता या आठवड्यात आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा होत असून गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघा ते सभा घेणार आहेत. येथूनच ते बंडखोर आमदारांवर तोफ डागणार आहेत.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे