By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 20:24 IST
1 / 9२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यात कट्टर विरोधक असलेले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित येत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मविआच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला परंतु तितक्यात सर्वांना धक्का देणारा पहाटेचा शपथविधी झाला.2 / 9मविआच्या सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा अचानक सकाळी माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचं समोर आले. ही खेळी नेमकी कुणाची, हे कुणालाच समजलं नाही. मात्र त्यानंतर बऱ्याचदा पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय चर्चा रंगल्या3 / 9नुकतेच धनजंय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. याचे सुनील तटकरे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली, पण याची शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.4 / 9त्याशिवाय मी दादांना सांगितलं होतं की हे षडयंत्र आहे, मात्र त्यांनी ते ऐकलं नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. २०१९ साली पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर अवघ्या ८० तासांत सरकार गेले. मात्र ५ वर्षानंतरही यावर चर्चा होतेय. धनंजय मुडे यांच्या विधानावरून छगन भुजबळ यांनी खुलासा केला आहे.5 / 9छगन भुजबळ म्हणाले की, धनंजय मुंडे जे बोलले ते मी ऐकले. हे षडयंत्र होते तर ते कुणी रचले, उद्धव ठाकरेंचे षडयंत्र असू शकत नाही. काँग्रेसचं असू शकत नाही. हे भाजपाच्या लोकांनी रचलं की राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. परंतु मला एक आठवतं, काँग्रेस-शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठका होत होत्या. 6 / 9या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांचा थोडा वाद झाला त्यानंतर पवारसाहेब बैठकीतून निघून गेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरूच होत्या. ८ वाजता एका ठिकाणी बैठक बोलावली होती परंतु त्या बैठकीला अजितदादा हजर नव्हते. पण दुसऱ्या दिवशी टीव्ही लावली तेव्हा अजितदादांचा शपथविधी झालाय हे दिसले असं छगन भुजबळ म्हणाले.7 / 9त्यानंतर मी ताबडतोब शरद पवारांना भेटलो, तोपर्यंत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही फोन केला होता, आपण मजबुतीने उभे राहिले पाहिजे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असं काही होईल याची आम्हालाही कल्पना नव्हती. तेव्हा आम्ही सुद्धा आमदारांना गोळा करण्याचं काम सुरू केले असं भुजबळांनी म्हटलं. 8 / 9त्यानंतर मी अजितदादांच्या घरी गेलो, हे असं करू नका. कोर्टाच्या निकालानंतर आम्ही अजितदादांना समजावले, तुम्ही शरद पवारांकडे परत या, त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. अजितदादा चुकले असतील तरी आपण परत घेतले पाहिजे अशी भूमिका मांडली. 9 / 9त्यानंतर अजितदादा बैठकीला आले, त्यांचे स्वागतही केले गेले. इतकेच नाहीतर अजितदादांना उपमुख्यमंत्री करा असं मीच ठराव मांडला होता. काहींना त्याचा राग आला पण मला जे योग्य वाटले ते मी केले असं भुजबळांनी सांगितले.