Ambani, Thackeray to Kamboj, Chief Minister Eknath Shinde's first Ganeshotsav
Eknath Shinde: अंबानी, ठाकरे ते कंबोज, मुख्यमंत्र्यांचा फिरस्ती गणेशोत्सव By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 11:17 PM1 / 11मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांपासून ते बड्या हस्तींच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेत आहेत. शिंदे यांनी आज भाजप आमदार प्रसाद लाड, केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. 2 / 11मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. दीड दिवसांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती.3 / 11 राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे या भेटीकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माहिम-दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. 4 / 11राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंद यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले5 / 11मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याही घरी जाऊन तेथील गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्याही उपस्थित होत्या.6 / 11मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याही घरी जाऊन तेथील गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्याही उपस्थित होत्या.7 / 11गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा सध्या फिरस्ती दौरा सुरू असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर यंदाचा गणेशोत्सव शिंदेंसाठी वेगळा अन् खास म्हणता येईल. 8 / 11केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घरीही त्यांनी भेट दिली. त्यावेळी, राणे कुटंबीयांसमवेत फोटोही काढले9 / 11भाजप नेते आणि सध्या ट्विट मुळे चर्चेत असलेले मोहित कंबोज यांच्याही घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. यावेळी, भगवान शंकरांची मूर्ती कंबोज कुटुबीयांनी त्यांना भेट दिली. 10 / 11भाजप आमदार प्रसाद लाड आणि मोहित कंबोज यांच्या घरातील गणरायाचे दर्शन घेतल्याचे फोटो मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 11 / 11कंबोज यांच्या कुटुंबीयांसमेवतही मुख्यमंत्री शिंदेंनी फोटोसेशन केले. आणखी वाचा Subscribe to Notifications