शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आंबोली पृथ्वीवरील स्वर्ग

By admin | Published: July 01, 2016 12:00 AM

1 / 8
आंबोलीतल्या धबधब्यातील पाण्यात आणि डब्यात बेडकाचं नेहमीच दर्शन होतं. डराव डराव करत अनेकांचं लक्ष वेधणारा हा प्राणी पावसाळ्यात जागोजागी पाहायला मिळतो.
2 / 8
आंबोलीत गेल्यावर चिखलात उमललेलं कमळ पाहिल्यास डोळ्यांचं पारणं फिटल्याचा अनुभव येतो. या नयनरम्य दृश्यानं मन आनंदित होते.
3 / 8
कावळेसाद हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे. प्रचंड खोल दरी आणि चारी बाजूनी डोंगर असं कावळेसाद ठिकाण अनेकांना आकर्षित करतं. असं म्हणतात एखादं जनावर दरीत पडतं (पडतं म्हणजे त्याची शिकार होते) त्यावेळेस कावळे दरीच्या तोंडाशी एकत्र कलकलाट करतात. त्यातून या ठिकाणाला कावळेसाद हे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते.
4 / 8
आंबोलीच्या पश्चिमेला महादेवगड उत्तरेला मनोहरगड हे किल्ले आहेत. तर मलईचे जंगल सनसेट पॉईंट नांगरकासा धबधबा अशी प्रेक्षणीय पर्यटकांच्या पसंतीस उतरतात.
5 / 8
अनेक जातीचे सर्प आंबोलीत पाहायला मिळतात. पावसाळ्यात सापटोळी घोणस मनियार सारख्या जातीचे साप दृष्टिक्षेपात पडतात. त्यामुळे इथं जाताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
6 / 8
आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून होते. नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशीचे मंदिर आणि आश्रम आहे. मंदिरातील हिरण्यकेशीची मूर्ती सुबक आणि सुंदर आहे तिच्याशेजारीच शंकराची पिंडी आहे आणि त्याच्या बाजूस गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. इथे एक रहस्यमय गुहा देखील आहे.
7 / 8
आंबोलीत गेल्यास परीक्षित ठिकाण पर्यटकांना आवर्जून खुणावतं. या ठिकाणांहून सूर्यास्त पाहिल्यास मन प्रफुल्लित होतं. पावसाळ्यात आंबोलीला गेल्यास स्वर्गात गेल्याचाच भास होतो.
8 / 8
कोकणातील सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सिंधुदुर्गातील आंबोली घाट. 690 मीटर उंचीवर असलेला आंबोली घाट हा वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आंबोलीत गेल्यावर आजूबाजूला सगळीकडे निसर्गानं पांघरलेला हिरवा शालू आणि पानांवरील दवबिंदू लक्ष वेधतात.