1 / 5मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र कोकण दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सावंतवाडी येथील औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित ठाकरे यांनी मुसळधार पावसात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनसोक्त भटकंती केली. 2 / 5फेसबूकवर फोटो शेअर करत अमित ठाकरे यांनी ही माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, काल सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेलो होतो. कोकणचा 'रानमाणूस' श्री. प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. 3 / 5या भटकंतीमध्ये इको-टुरीझमचे महत्त्व जाणून घेतले. सह्याद्रीतील अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पायवाटेवर अनेक धबधबे पाहिले.4 / 5बायो-डायव्हर्सिटीने संपन्न असा हा सावंतवाडी, दोडामार्ग इथला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आपण सर्वांनी जीवापाड जपायला हवा. 5 / 5कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला क्वचितच अनुभवायला मिळतं. कोकणातल्या निसर्गाचं मोल आपण ओळखायला हवं, असं आवाहनही अमित ठाकरे यांनी केलं.