शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवरी नटली! अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर, अंबानींच्या धाकट्या सुनेच्या पारंपरिक थाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 2:27 PM

1 / 8
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहेत.
2 / 8
त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. हळदी आणि संगीत समारंभानंतर लग्नाच्या पूर्वसंध्येला अंबानींच्या अँटिलीयामध्ये शिवपूजा आणि गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं.
3 / 8
यासाठी राधिकाने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. लग्न सोहळ्यातील तिचे काही फोटो समोर आले आहेत.
4 / 8
राधिकाने पांढऱ्या रंगाची गुजराती साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. या पारंपरिक आणि साध्या लूकमध्येही तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं.
5 / 8
गरबा नाईटसाठी खास जांभळ्या रंगाच्या भरजरी लेहेंग्यात राधिका दिसली. तर अनंत अंबानीने गुलाबी रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला होता.
6 / 8
अंबीनांच्या अँटिलियामधील गरबा नाईटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7 / 8
अंबानीचं धाकट्या सुनेचा थाट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. राधिकाच्या वेडिंग सोहळ्यातील या लूकची सर्वत्र चर्चा आहे.
8 / 8
अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत. तर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही या लग्नसोहळ्याचं आमंत्रण आहे.
टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीCelebrity Weddingसेलिब्रेटी वेडिंग