शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 9:33 PM

1 / 6
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं आहे. श्रीगणेशाची 10 दिवसांसाठी स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पूजा केली.
2 / 6
नागपुरात नितीन गडकरींच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आलीय. गडकरी वाड्यात गणपतीच्या सरबराईची आणि आदरातिथ्याची लगबग आहे. गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली.
3 / 6
कोथळी ता.मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापनेप्रसंगी राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे.सोबत त्यांच्या पत्नी आणि महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे. शेतकरी कर्जमुक्त होवो अशी प्रार्थना त्यांनी गणरायाला केली.
4 / 6
पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुंडे यांचे पती, मुलं, आई, बहीण यावेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे यांच्या घरी पाच दिवस गणपती असतो.
5 / 6
राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी सपत्नीक श्रीं ची स्थापना केली.
6 / 6
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथील निवासस्थानी श्रीं ची स्थापना केली. सोबत त्यांच्या पत्नी व जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन.
टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडेNitin Gadkariनितीन गडकरीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार