शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 11:23 PM

1 / 9
Baba Siddique Murder: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सिद्दिकी यांच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आले होते.
2 / 9
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत सिद्दिकी यांनी आपले प्राण गमावले होते.
3 / 9
या हत्या प्रकरणानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
4 / 9
अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सरकारकडून बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र अशी सुरक्षा असतानाही आज त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
5 / 9
आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून ही हत्या केली. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले जात होते. फटाक्यांच्या आवाजाच्या फायदा घेत हा गोळीबार करण्यात आला.
6 / 9
सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीन जण तोंडाला रुमाल बांधून आले होते. या आरोपींकडून एकूण ६ गोळ्या झाडण्यात आल्या.
7 / 9
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
8 / 9
दरम्यान, कधीकाळी राज्याचं मंत्रिपद भूषवलेल्या आणि एका आमदाराचे वडील असलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनं राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
9 / 9
'राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर नियंत्रण नसल्यानेच वारंवार असे प्रकार घडत आहेत,' असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.
टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार