Balasaheb of Satara; Modi from Mumbai; Take a look at some unexpected photos during the Lok Sabha
सातारचे बाळासाहेब तर मुंबईचे मोदी; पहा प्रचारावेळचे काही आगळेवेगळे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 5:34 PM1 / 6लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साताऱ्यात राष्ट्रवादीचा तर नरेंद्र मोदी मुंबईत भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आले होते. वाचून आश्चर्य वाटले ना, काही अंशी खरे आहे. कसे ते पाहा फोटोंमधून. 2 / 6साताऱ्याचे बाळासाहेब म्हणून ओळखले जाणारे मधुकर शेवड़े यांनी राष्ट्रवादीची टोपी घातली होती. खरे बाळासाहेब हे शिवसेनेचे नेते होते. पण त्यांच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या शेवडे यांनी राष्ट्रवादीची टोपी घातल्याने ते सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. 3 / 6मालडचे रहिवासी असलेले नरेंद्र मोदींची डुप्लिकेट विकास महंते यांनी उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरताना हजेरी लावली. हुबेहुब मोदींना पाहून कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. 4 / 6 साताऱ्यामध्ये महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सर्वपक्षांचे झेंडे एकत्र आले होते. जणूकाही शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादीची युती झाली की काय असे वाटत होते. 5 / 6प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना सर्वच पक्षांची दमछाक होत आहे. यातच शक्तीप्रदर्शन म्हटले की लवाजमा आलाच. यासाठी महिलांनाही बोलावले जाते. उन्हाच्या कडाक्यात साताऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी लहान मुलांना घेऊन आलेल्या महिला. 6 / 6क्रिकेटमध्ये भारताच्या प्रत्येक सामन्यात इंडिया आणि सचिन तेंडुलकरचे नाव रंगवून उपस्थित राहणारा सुधीर आठवत असेल. कोकणात नारायण राणेंचा स्वत:चा पक्ष निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्र स्वाभिमानीचा एक कार्यकर्ताही असाच रंगून प्रचारात, सभेमध्ये फिरत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications