नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
एसटी बसच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी: प्रवासादरम्यान बस बिघडल्यास त्याच तिकिटात करा AC बसमधून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 16:52 IST
1 / 8प्रवासादरम्यान रस्त्यात एसटी बस नादुरुस्त होऊन बंद पडणे, ओव्हरहीट होणे, पंक्चर होणे यांसारख्या घटना प्रवाशांसाठी काही नवीन नाही. याचा प्रवाशांसह बसचालके आणि वाहकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यात बस बंद पडल्यास पर्यायी कोणत्याही बसने प्रवास करण्याची संधी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.2 / 8या सोयीमुळे प्रवाशांना मूळ तिकिटावरच कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता उच्च श्रेणीतील बसने प्रवास करणे शक्य होणार आहे. रस्त्यावर धावणाऱ्या खिळखिळ्या एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. 3 / 8एसटीच्या प्रवासीभिमुख निर्णयामुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच, साध्या बसने प्रवास करत असताना त्या बसचा अपघात झाल्यास किंवा बिघाड झाल्यास हिरकणी किंवा शिवशाही बसनेही प्रवास करता येईल.4 / 8भरउन्हात ताटकळण्याची गरज नाही- आता साधी बस बंद पडल्यास अथवा अपघात झाल्यास त्याच श्रेणीची बस उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांना वाट पाहावी लागत असे. अनेक मार्गावर बसची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांना भरउन्हात ताटकळण्याची वेळ येत होती. परिणामी प्रवाशांचा खोळंबा होत होता. परंतु, या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.5 / 8साधे तिकीट एसी बसमध्येही चालणार? एसटीचा मार्गात अपघात किंवा बिघाड झाल्यास प्रवाशांना त्याच श्रेणीतील बसमधून प्रवास करणे सक्तीचे होते. मात्र आता साधी बस रस्त्यात बंद पडल्यास त्या बसच्या प्रवाशांना मूळ तिकिटावरच शिवशाही किंवा शिवनेरी बसने ही प्रवास करता येईल.6 / 8पूर्वीचा नियम काय ? पूर्वी एसटी बस बंद पडल्यास अथवा अपघात झाल्यास पाठीमागून येणाऱ्या त्याच प्रकारच्या बसमधून प्रवासाची मुभा दिली जात होती. त्यातच जर उच्च श्रेणीची बस आल्यास तिकिटाच्या फरकाची रक्कम भरावी लागत होती.7 / 8नियमात सुधारणा काय? नवीन नियमानुसार रस्त्यात बंद पडल्यास त्याच श्रेणीतील बसने प्रवास करावा लागेल, अशी अट रद्द करण्यात आली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता प्रवाशांना उच्च श्रेणीतील बसने प्रवास करता येईल.8 / 8महामंडळाच्या बसचे प्रकार कोण-कोणते ? साधी बस, जलद, रातराणी, निमआराम, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध, मिडी.