शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'भ्रष्टाचाराचा कोविड' म्हणत भाजपाचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

By महेश गलांडे | Published: March 04, 2021 6:32 PM

1 / 9
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोना काळातील आरोग्य सुविधांचा आणि भ्रष्टाचारा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. विधानसभेत विरोधकांनी कोरोना काळातील घटनांवरुन गंभीर आरोप केले.
2 / 9
आमदार रवि राणा यांनीही कोरोना कालावधीतील आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे आपल्या भाषणाता काढले, तसेच माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहीमेवरही टीका केली.
3 / 9
कोरोना काळात केवळ व्हेंटीलेटर न मिळाल्यामुळे 12 जणांचा जीव आपल्या मतदारसंघात गेल्याचे त्यांनी सांगितले, तसेच अनियमितता आणि भ्रष्टाचाराचेही आरोप त्यांनी लागवले.
4 / 9
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोरोना काळात आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरुनही त्यांनी टीका केली
5 / 9
कोरोनाच्या नावाखाली राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न मागविताच कोविडचे कोट्यवधीचे साहित्य खरेदी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आज भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन केले.
6 / 9
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात भष्ट्राचार केला असून त्यावर प्रकाश टाकणारे 'भ्रष्ट्राचाराचा कोविड' हे पुस्तक प्रकाशित केल्याचे आमदार असीम साटम यांनी सांगितले.
7 / 9
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व आमदार उपस्थित होते.
8 / 9
मविआ सरकारने कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे अपेक्षित आहे. या अनुशंगाने कोरोनाच्या नावाखाली राज्यातील जनतेला मृत्यूच्या दारात लोटणाऱ्या आघाडी सरकारचा निषेध असे म्हणत भाजपा आमदारांनी सभागृहाबाहेरील पायरीवर आंदोलन केले.
9 / 9
कोविड काळातील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपा आमदार भ्रष्ट्राचाराचे बॅनर झळकावत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यावेळी, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस