शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी पैशात घ्या मोठं घर, पण आधी जाणून घ्या Carpet, Built up & Super Area चं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 5:31 PM

1 / 10
वेगाने बदलणाऱ्या आजच्या काळात जगात रोजच्या रोज काहीतरी नवीन बदल होतायेत. आजही घर खरेदी करताना ग्राहकांना फायदा होत नाही. घर खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य प्रोजेक्टची निवड करणे, उत्तर फ्लॅट निवडणे कठीण बनले आहे.
2 / 10
आजही बहुतांश ग्राहकांना कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया आणि सुपर एरियाचं गणित समजत नाही. त्याचमुळे अनेक ग्राहकांची फसवणूक होते. जर तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे.
3 / 10
कार्पेट एरिया - याचा अर्थ असा की घर खरेदी करणाऱ्याला फ्लॅटमध्ये किती जागा वापरायला मिळणार, फ्लॅटच्या आतमध्ये भिंत सोडून ज्या एरियाचा वापर केला जातो. त्याला कार्पेट एरिया म्हटलं जाते.
4 / 10
बिल्ट-अप एरिया - फ्लॅटच्या आतील भिंतींनी समाविष्ट केलेल्या क्षेत्रास बिल्ट-अप एरिया म्हणतात. बिल्ट-अप एरियामध्ये फ्लॅटचे कार्पेट एरिया आणि भिंतींचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे. साधारणपणे फ्लॅटचा कार्पेट एरिया बिल्टअप एरियापेक्षा ५ ते १० टक्क्यांनी कमी असते.
5 / 10
सुपर एरिया - कार्पेट एरिया, बिल्ट अप एरिया यासह कॉमन जागा मिळून तयार होणाऱ्या क्षेत्रास सुपर बिल्ट-अप एरिया म्हणतात. बिल्डर नेहमी सुपर एरियातील फ्लॅटचा आकार सांगतो.
6 / 10
समान आकाराच्या सुपर एरियाच्या फ्लॅटचा कार्पेट एरिया समान असतो, असा सर्वसाधारण समज खरेदीदारांमध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. कार्पेट एरिया हा प्रकल्पाच्या मांडणीवर आणि लोडिंगवर अवलंबून असते.
7 / 10
कोणत्याही फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ मोजणे खूप सोपे आहे. कोणत्या फ्लॅटमध्ये जास्त कार्पेट एरिया आहे आणि कोणत्या फ्लॅटमध्ये कमी आहे हे तुम्ही ठरवू शकता. कसे ते जाणून घ्या
8 / 10
कार्पेट एरियाची गणना कशी करावी - जर तुम्ही 1BHK फ्लॅट बुक करणार असाल आणि त्याचा आकार ७०० चौ.फूट असेल. त्याचा कार्पेट एरिया काढण्यासाठी विकासकांनी दिलेल्या फ्लॅटचे पुस्तिका घ्या. त्यावरून त्या फ्लॅटचा लेआउट प्लॅन पहा आणि कार्पेट एरियाची जागा मोजा.
9 / 10
गणित समजून घ्या - बेडरूम आकार - १२*१० = १२० चौरस फूट, लिव्हिंग रूमचा आकार - १४*१०.६ = १४८.४ चौरस फूट, स्वयंपाकघर – ७*५=३५ चौ.फूट, शौचालय – ४.३*७.६= ३२.६८ चौ.फूट, बाल्कनी - ४*४=१६ चौ.फूट, दुसरी बाल्कनी - ५*५=२० चौरस फूट, या सर्व जागांचे क्षेत्र जोडल्यास एकूण क्षेत्रफळ = ३७२.०८ चौरस फूट
10 / 10
जर ७०० चौरस फूट फ्लॅटमध्ये २५% लोडिंग असेल, तर हे क्षेत्र = १७५ चौरस फूट. अशावेळी फ्लॅटचा कार्पेट एरिया ५२५ चौरस फूट असावा, परंतु विकासक तुम्हाला सुमारे ३७२.०८ चौरस फूट क्षेत्रफळ देत आहे. म्हणजे सुमारे ४५ टक्के लोडिंग झाले. या सूत्राचा वापर करून आपण कोणत्याही आकाराच्या फ्लॅटच्या कार्पेट एरियाची गणना करू शकता. असे करून तुम्ही कमी पैशात मोठा फ्लॅट घेऊ शकता.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन