शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भाजपची पहिली यादी ऑगस्ट अखेरीस? महाराष्ट्रात शिंदे, अजित पवारांचे काय? मोठी रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:03 AM

1 / 7
भाजपा आता विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणइ झारखंडमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका लागणार आहेत. यापैकी हरियाणात भाजपाची सत्ता आहे, तर महाराष्ट्रात भाजप युतीची सत्ता आहे. झारखंडमध्ये झामुमो सत्तेत आहे. यामुळे लोकसभेला दणकून मार बसलेल्या महाराष्ट्रात भाजप मोठी तयारी करत आहे.
2 / 7
महाराष्ट्रात भाजपा १५० च्या वर जागा लढविणार आहे. यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाला काय मिळणार असाही सवाल उपस्थित होत आहे. लोकसभेच्या मतदानावर भाजपाने या १५० जागाही निवडल्या आहेत. या बहुतांश सर्व जागांवर भाजपा लीडवर होती. यामुळे शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दुय्यम मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास युतीत दगाफटका होण्याचीही दाट शक्यता आहे.
3 / 7
येत्या सप्टेंबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात भाजपा सर्व राज्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी करत आहे. सर्व राज्यांत प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच काही बैठकाही झाल्या आहेत.
4 / 7
ईटीच्या वृत्तानुसार भाजप या महिन्याच्या अखेरीस तीन राज्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील ३० ते ३५ जागांवरील उमेदवार, हरियाणातील २० आणि झारखंडच्या २५ उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
5 / 7
यासाठी भाजपाने फॉ़र्म्युला ठरविला आहे. पहिल्या यादीत अशा जागा असतील ज्या गेल्या निवडणुकीत भाजपा हरली होती किंवा कमी अंतराने जिंकली होती. या जागांवर तयारीसाठी उमेदवाराला वेळ मिळावा म्हणून पहिली यादी जाहीर केली जाण्याची रणनिती भाजपाने आखली आहे. या जागा मुख्यता एससी, एसटी आरक्षणाच्या असणार आहेत.
6 / 7
लोकसभा निवडणुकीत एससी मतांचा मोठा भाग इंडिया आघाडीकडे वळला होता. वेळेच्या आधीच उमेदवार दिले तर त्यांना या समाजाच्या आव्हानांना तोंड देण्यास वेळ मिळणार आहे. हरियाणा, झारखंडमध्ये जागा जाहीर करण्यास भाजपाला कोणताही त्रास होणार नाही. परंतू, महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला विश्वासात घ्यावे लागणार आहे.
7 / 7
१५ ऑगस्टनंतर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. यात पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मागील निवडणुकीत ज्या जागांवर भाजपा हरली होती, गेल्या वर्षी त्या जागांवर आधी उमेदवार जाहीर केले होते. ही रणनिती यशस्वी ठरली होती. या तिन्ही राज्यांत भाजपाचे सरकार आले आहे.
टॅग्स :BJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार