ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 : कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अॅवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे स्टाईल आणि स्टाईलिश व्यक्तीमत्त्व याला नव परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा पार पडला. ग्लॅमर, उद्योग अन् फॅशनच्या जगतात वावरत असताना तुमची ‘स्टाइल’च तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवित असते. कारण यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होत असतानाच तुम्हाला फॉलो करणारा वर्गही तुमच्या यशाबरोबरच तुमच्या स्टाइलविषयी जाणून असतो. महाराष्टातील अशाच काही स्टायलीश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेत त्यांना सन्मानित केले आहे. पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान.. रेड कार्पेटवर गुलशन ग्रोव्हर, अजिंक्य रहाणे, साई ताम्हणकर यांच्या सह अनेक सेलिब्रिटीचा जलवा बघावयास मिळाला. गुलशन ग्रोव्हरने आपल्या "बॅड मॅन" अँटिट्यूडसह एन्ट्री घेतली आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सूटमध्ये एकदम डॅशिंग दिसतोय. मराठीतील आघाडीची तारका साई ताम्हणकर पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अमृता खानविलकर हिची एंट्री विषेश आकर्षक ठरली. बॅकलेस वनपीस ड्रेस मध्ये तिचे सौन्दर्य अधिकच खुलून दिसत होते. CLICK HERE: ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचेसुद्धा आगमन झाले आहे. संवाद साधताना त्यांनी म्हटले की, मी चांगले जे दिसते आणि समोर जे येते ते परिधान करणे पसंत करतो. मला वाटते की, स्वभावातून व्यक्तीची स्टाईल दिसावी. परंतु अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटतेय. माझ्यासाठी माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे स्टाईल आयकॉन आहेत. मग ती त्यांची बोलण्याची स्टाईल असो वा काम करण्याची, त्यांची स्टाईल वेगळी होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली असून फुलवा खामकर आणि ग्रुपने गणेश वंदनेने धमाकेदार स्टार्ट केली आहे. पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान..लोकमत समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी उपस्थित पाहुणे व सत्कारमुर्तींचे स्वागत केले. संबोधित करताना त्यांनी ह्यलोकमतची भूमिका मांडताना या सोहळ्यांची संकल्पना स्पष्ट केली. उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचा त्यांनी शब्दसुमनांनी गौरव केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यासाठी नागपूरात वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल आयोजित करण्याची घोषणा केली.स्टाईल काय असते हे स्पष्ट करताना ते म्हणाले की, स्टाईल केवळ कपड्यात नसते ती व्यक्तीच्या कर्तृत्वात असते. त्या अर्थाने विविध क्षेत्रात छाप पाडणारे सर्व मान्यवर स्टाईलशिलश आहेत. महाराष्ट्राचे लाडके कलाकार सुयश टिळक आणि क्रांती रेडकर लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे सुत्रसंचालन करत आहेत. त्यांची जुगलबंदी कार्यक्रमात रंगत आणत आहे. CLICK HERE: ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा महेश मांजरेकरांचेसुद्धा आगमन झाले त्यांचे स्वागत लोकमत समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले. यावेळी त्यांच्या हेअरस्टाईलचे कौतुक करण्यापासून गुलशन ग्रोव्हर स्वत:ला रोखू शकला नाही. आजच्या रंगारंग सायंकाळच्या पहिल्या पुरस्काराचे वितरण झाले असून गायिका प्रियंका बर्वेला राजकीय नेते अमरसिंग यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने प्यार किया तो डरना क्या हे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना हा पुरस्कार महेश मांजरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान.. )महेश कोठारेप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता अशी ओळख निर्माण करत रसिकांचे फेव्हरेट बनलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे महेश कोठारे. मराठीमध्ये धुमधडाका, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, पछाडलेला, माझा छकुला अशा एकाहून एक सरस सिनेमा देणारे महेश कोठारे. आपल्या अभिनयासोबतच दिग्दर्शनाने त्यांनी चित्रपटसृष्टीत एक नवी उंची गाठली आहे. आजही त्यांचा उत्साह आणि कामाचा आवाका तरुणांनाही लाजवेल असाच असतो. त्यांच्या याच असामान्य कर्तृत्वाची दखल घेत या पुरस्कार सोहळ्यात महेश कोठारे यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरवण्यात आले. विजय दर्डा यांच्या हस्ते महेश कोठारे यांना हा पुस्कार प्रदान करताच उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.आणि मनोरंजन, राजकीय, व्यवसायिक क्षेत्रातील विविध फॅशनेबल व स्टायलिश मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रामाची सांगता झाला. यापूर्वी कधीही न झालेला कार्यक्रम असाच ह्यलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्डचे वर्णन करावे लागेल. मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट म्हणून संजय सेठी यांचा लोकमतचे इडिटर-इन-चीप राजेंद्र दर्डा, समुह संपादक दिनकर रायकर, करूण गेरा यांनी सन्मान केला. शाल्मली खोलगडेइश्कजादे या सिनेमातील मैं परेशान परेशान... या गाण्यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी मराठमोळी गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे. पदार्पणातच सर्वोत्कृष्ट गायिका या कॅटेगिरीत फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी शाल्मली तिच्या स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. आपल्या सूरांनी शाल्मलीने रसिकांवर मोहिनी घातली आहे. शाल्मलीच्या या लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी तिला मोस्ट स्टायलिश गायिका या अवॉर्डने गौरवण्यात आले. संजय सेठी, विजय दर्डा यांच्या हस्ते शाल्मलीला हा पुरस्कार देण्यात आला. अतुल कसबेकरआपल्या लेन्सच्या नजरेतून दिग्गजांच्या छबी कॅमेऱ्यात कैद करणारा प्रसिद्ध आणि स्टायलिश छायाचित्रकार म्हणजे अतुल कसबेकर. अतुलने आजवर अनेक बड्या स्टार्सना वेगळी ओळख देऊन नवा ट्रेंड सेट केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल या पुरस्कार सोहळ्यात घेतली गेली आहे. त्याला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ट्रेंडसेटर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा, जितेंद्र आणि नितीन सरदेसाई यांनी अतुलला हा पुरस्कार प्रदान केला. सोनम कपूर इंडस्ट्रीमध्ये ज्या मोजक्या अॅक्ट्रेस त्यांच्या हटके स्टाइलसाठी ओळखल्या जातात, त्यातील एक नाव म्हणजे सोनम कपूर होय. नेहमीच काही तरी वेगळी स्टाइलकरून लाइमलाइटमध्ये राहणारी सोनम स्टाइल आयकॉन म्हणून समोर येत आहे. सोनमचा हाच स्टाइल सेन्स हेरून तिला मोस्ट स्टायलिश अभिनेत्री या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सोनमचा गौरव करण्यात आला. साजिद नाडियाडवालासाजिद नाडियाडवाला यांना त्यांच्या विशिष्ट सिनेमांसाठी ओळखले जाते. सद्यस्थितीत त्यांचे इंडस्ट्रीमधील स्थान महत्त्वपुर्ण असून, फॅन्सनाही नेहमीच त्यांच्या सिनेमाची आतुरता असते. अशा या मोस्ट स्टायलिश निर्माता आणि दिग्दर्शकाला सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साजिद नाडियाडवाला यांना हा पुरस्कार प्रताप दिगावकर आणि सज्जन जिंदाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोनाली बेद्रेबॉलीवुडमध्ये सोनालीने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले. छम छम करता हैं... या अगं बाई अरेच्चा सिनेमातील गाण्यावर थिरकत सोनालीने रसिकांना आश्चयार्चा सुखद धक्का दिला. सोनालीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स आणि स्टाइलसुद्धा रसिकांवर जादू करुन गेली आहे. त्यामुळेच सोनालीला या पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा काकडे यांनी सोनालीचा हा पुरस्कार देऊन सन्मान केला. आशुतोष गोवारीकरबॉलिवूडला ऑस्करपर्यंत नेणारे आणि वैविध्यपूर्ण विषय घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत झेप घेत नवा इतिहास निर्माण केला होता. त्यानंतर स्वदेस, जोधा अकबर, मोहनजोदारो असे दजेर्दार सिनेमांची आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या याच कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्ममेकर हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आशुतोष गोवारीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राकेश रोशन आणि लोकमतचे विजय दर्डा उपस्थित होते. टायगर श्रॉफडान्स, बॉडी, अॅक्टिंग आणि स्टाइल असे सर्वगुण असलेला अभिनेता टायगर श्रॉफ हा अल्पावधितच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. खरं तर टायगर सध्या यंग जनरेशनसाठी ह्यस्टाइल आयकॉन ठरत आहे. टायगर श्रॉफच्या या स्टाइलचा गौरव करण्यासाठी त्याला लोकमतने मोस्ट स्टायलीश अभिनेता या अवॉर्डने गौरविले आहे. टायगरला हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र दर्डा हस्ते प्रदान करण्यात आला. हृतिक रोशनआपल्या हटके डान्स शैलीने तरुणांचे मने जिंकणारा अभिनेता तिक रोशन हा त्याच्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. नेहमीच काही तरी हटके स्टाइल करून चर्चेत राहणारा हृतिकची एक झलक त्याच्या फॅन्ससाठी पर्वणीच ठरत असते. नुकताच रिलिज झालेल्या त्याच्या काबील या सिनेमातील त्याची स्टाइल हल्ली तरुणार्इंमध्ये फॉलो केली जात आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे या पुरस्कार सोहळ्यात हृतिकला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश सुपरस्टार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हृतिकचा यावेळी गौरव करण्यात आला. गौतम सिंघानियारेमंड समूहाचे एमडी आणि चेअरमन तसेच उद्योग विश्वातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे गौतम सिंघानिया. उद्योगविश्वात दिलेल्या योगदानासाठी गौतम सिंघानिया यांना या पुरस्कार सोहळ्यात ह्यमोस्ट स्टायलिश इंडस्ट्रियालिस्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौतम सिंघानिया यांना हा पुरस्कार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. यावेळी बिट्टा सिंग उपस्थित होते. सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल भारतीय उद्योग समूहातील एक आघाडीचे नाव म्हणजे जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल. स्टील, खाणकाम, वीज अशा विविध क्षेत्रात उद्योगाचा गाडा समर्थपणे चालवणारे उद्योगपती सज्जन जिंदाल यांची अनोखी स्टाइलही तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणत्याही पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो असे म्हणतात. त्यानुसारच सज्जन यांच्या यशात त्यांची पत्नी संगीता जिंदाल यांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच या जोडीला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर कपल या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार सज्जन आणि संगीता जिंदाल यांना प्रदान करण्यात आला. अमृता फडणवीसमोस्ट स्टायलिश पॉवर वुमन म्हणून पत्नी अमृता फडणवीस यांना सन्मानित करण्यात आले. परंतु त्या उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्यातर्फे देवेंद फडणवीस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी हृतिक रोशन, राकेश रोशन, कौशिक मराठे स्टेजवर उपस्थित होते. स्वप्निल जोशीछोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका साकारत घराघरात पोहचलेला आणि आजच्या तरुणाईचा मराठमोळा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाइलने स्वप्नीलने तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. स्वप्नीलच्या याच लोकप्रियतेमुळे तो ह्यमोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. स्वप्नीलला हा पुरस्कार लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे अध्यक्ष ऋषी दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मिथिला पालकरकप साँगमुळे अल्पवधीतच वेबविश्वात धुमाकूळ घालणारी मराठमोळं सेन्सेशन म्हणजे मिथिला पालकर. कपच्या तालावरील तिचे हिची चाल तुरु तुरु... नेटिझन्ससह रसिकांनाही भावले. वेबविश्वासह मिथिलाचे अनेक फॅन्स निर्माण झालेत. त्यामुळेच मिथिलाला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रायसिंग युट्यूब स्टार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मिथिलाला हा पुरस्कार अरविंद सेतुरयाल विकी रतनानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. CLICK HERE: ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा गुड मॉर्निंग मुंबई हा आवाज रेडिओवरुन कानावर पडला की तो निश्चितच आरजे मलिश्काचा असणार हे कुणीही अचूक सांगेल. आपल्या आवाजाच्या सामर्थ्याने मलिश्का कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत बनली आहे. त्यामुळेच तिच्या या लोकप्रियतेचा मोस्ट स्टायलिश आरजे हा पुरस्कार प्रदान गौरव करण्यात आला. मलिश्काला महेश मांजरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. CLICK HERE: ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा - महाराष्ट्राची सो कुल अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान.. - क्रिकेट विश्वात नवी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अजिंक्य रहाणेला मोस्ट स्टायलिश स्पोर्टपर्सन म्हणून गौरवण्यात आले. त्याला हा पुरस्कार गौतम सिंघानियांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मराठीतून भाषण करताना तो म्हणाला, की, प्रत्येक पुरस्कार मला प्रोत्साहित करतो. हा स्टाईल अवॉर्डही मला मैदानाबाहेर अधिक स्टायलिश राहण्यास प्रेरित करेल पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान.. - अल्पवधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारुन अभिनेत्री राधिका आपटेने बॉलिवूडच नव्हे तर जगभरातील रसिकांची मने जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते. तितकीच तिची स्टाइलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर आहेत. राधिकाच्या या लोकप्रियतेमुळे तिला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश क्रॉसओव्हर आयकॉन हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राधिकाला हा पुरस्कार सौरभ गाडगीळ आणि गौतम सिंघानिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान.. - बीटेक केल्यानंतर टाटा मोटर्स सारखी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून हनुमंत गायकवाड यांनी साफसफाई आणि देखरेखीचा एक नवा उद्योग सुरु केला. बीवीजी अर्थात भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक नवा समूह सुरु केलाच त्याचबरोबर या ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला. हनुमंत गायकवाड यांच्या याच प्रतिभेची दखल घेत त्यांना या पुरस्कार सोहळ्यात मोस्ट स्टायलिश सोशल एंट्रेप्रन्यूयर अवॉर्डने गौरवण्यात आले. गायकवाड यांना गुलशन ग्रोव्हर आणि प्रवीण परदेशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. CLICK HERE: ‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा - वाजले की बारा म्हणत आपल्या नृत्याने रसिकांची लाडकी बनलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या डान्ससोबतच अभिनय आणि स्टाइलने अमृताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृताचे फॅन्स तिचा डान्ससोबतच तिच्या अदा आणि स्टाइलवर फिदा असतात. अमृताला मोस्ट स्टायलिश रिडर्स चॉईस या अवॉर्डने गौरविण्यात आले. संजय उपाध्याय यांच्या हस्ते अमृताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.यावेळी अमृतासाठी एक स्पेशल सरप्राईज होते. सई ताम्हणकर आणि महेश मांजरेकर यांना स्टेजवर बोलावण्यात आले. यावेळी मांजरेकरांनी सई आणि अमृताला स्टाईल विषयी प्रश्न विचारले. सई ताम्हणकर म्हणते, सोनम कपूर माझी फॅशन आयकॉन आहे. अमृताही खूप स्टाईलिश आहे.पाहा लाईव्ह ‘लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डमध्ये स्टायलिश मान्यवरांचा सन्मान..