शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रभागेला आला भक्तीचा महापूर

By admin | Published: July 27, 2015 12:00 AM

1 / 9
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..... कल्याणमधील विठ्ठल मंदिरातील विठुरायाचे हे भावपूर्ण रुप.
2 / 9
आम्ही वारकरी... राज्यातील विविध शाळांमध्येही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल - रुक्मिणी व वारकरीच्या वेशभूषेतील ही चिमुकली मुलं वारकरी परंपरेचा वारसा पुढे नेण्याची ग्वाहीच देत होती.
3 / 9
आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीण गेला अवघा आनंद झाला
4 / 9
सुमारे ११ लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत दाखल झाली असून चंद्रभागेत स्नान करताना भाविक
5 / 9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील विठूरायाचे दर्शन घेतले.
6 / 9
पंढरपूर येथील महापूजेवेळी एकनाथ खडसे बबनराव लोणीकर माधव भंडारी आदी मान्यवर नेत उपस्थित होते.
7 / 9
विठ्ठल - रखुमाई मंदिरातील पूजेचा मान हिंगोलीच्या राघोजी व संगीता धांडे या दाम्पत्त्याला मिळाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी धांडे दाम्पत्त्याचा सत्कारही केला.
8 / 9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्यातील दुष्काळाचे सावट दूर होवो असे असं साकडंही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला गाठले.
9 / 9
सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाल्यानंतर चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आला आहे. अवघी पंढरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारीतील क्षणचित्रे खास वाचकांसाठी...