Citizen good response to 'Janata curfew'; on the streets of Mumbai blank vrd
'जनता कर्फ्यू'ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुंबईतल्या रस्त्यांवर शुकशुकाट By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 4:11 PM1 / 15राज्यातले दिवसरात्र वाहनं आणि मनुष्यांनी गजबजलेले रस्ते आज निर्मनुष्य झालेले पाहायला मिळाले.2 / 15ठाणे-मुंबईकरांनी घरी राहूनच जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद देत कोरोनाशी सुरू असलेल्या लढाईत आपला सहभाग दाखवला. 3 / 15पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. कायम वर्दळ असणाऱ्या पुण्यात आज स्मशान शांतता पसरली होती. 4 / 15नागपूरमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून, जनता कर्फ्यूला लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. 5 / 15मुंबईतल्या हाजी अली आणि महालक्ष्मी परिसरातही रस्त्यांवर सन्नाटा होता.6 / 15शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. दुधापासून ते पेट्रोल पंपापर्यंत सर्व बंद करण्यात आलं होतं. 7 / 15मुंबईतली दादर, माटुंग्यासारखी रेल्वे स्थानकं ओस पडल्याचं चित्र होतं. 8 / 15. जनता कर्फ्यूला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे, नवी मुंबईतील सर्व रस्ते शून्य होते, तसेच सगळे व्यवहारसुद्धा ठप्प झाले होते, 9 / 15कोल्हापूरमधून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यूच्या काळात शुकशुकाट होता. 10 / 15पोलिसांची जागोजागी तपासणी सुरू असून, चिपळूण -गुहागर -संगमेश्वरमध्येही आज कडकडीत बंद होता. 11 / 15 दिवसभर नागरिक घरात थांबल्याने ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी झाल्याचं चित्र आहे. 12 / 15जनता कर्फ्यूनिमित्त संपूर्ण अंबरनाथ आणि बदलापूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. 13 / 15राज्यातील अनेक आगारांत एसटी बसेस कधी नव्हे त्या रांगेत उभ्या असलेल्या पाहायला मिळत होत्या. 14 / 15मॉल्स आणि मल्टिफ्लेक्समध्येही आज एकदम शुकशुकाट होता. 15 / 15पोलिसांची जागोजागी तपासणी सुरू असून, चिपळूण -गुहागर -संगमेश्वरमध्येही आज कडकडीत बंद होता आणखी वाचा Subscribe to Notifications