शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदी अन् अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 1:50 PM

1 / 9
महाराष्ट्राच्या राजकीय डावपेचात मोठमोठ्या घडामोडी घडत आहे. आगामी निवडणुका पाहता सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी तयारी सुरू आहे. बैठका आणि चर्चा यांचा सिलसिला सुरू आहे. एकीकडे बंगळुरूत विरोधकांची बैठक होत असताना दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडली.
2 / 9
दिल्लीतील या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाच्या निमंत्रणानंतर उपस्थित होते. परंतु या बैठकीनंतर काही वेळात वेगळेच चित्र माध्यमांना पाहायला मिळाले. बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे बाहेर गेले.
3 / 9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर येताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावर गेले तेव्हा अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्यात एक बैठक झाल्याची माहिती आहे.
4 / 9
या नेत्यांमध्ये बंद खोलीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. NDA च्या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेत्यांसोबत आणखी एक बैठक झाली. ज्यात अजित पवार, अमित शाह, जे. पी नड्डा आणि प्रफुल पटेल यांचा समावेश होता.
5 / 9
या बैठकीत काय चर्चा झाली त्याचा खुलासा अद्याप झाला नाही. बैठकीनंतर सर्व नेते बाहेर गेले तेव्हा या चार नेत्यांमध्ये चर्चा झाली. सूत्रांनुसार, बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही हजर होते. बैठकीनंतर मोदींना सोडण्यासाठी सर्व नेते बाहेर कारपर्यंत आले. तेव्हा अजित पवार, प्रफुल पटेलही होते.
6 / 9
दुसरीकडे अजित पवार आणि बंडखोर राष्ट्रवादी नेत्यांनी मागील २ दिवस सलग शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरला जाऊन भेट घेतली होती. शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, पक्षात फूट पडू नये यासाठी पवारांना विनंती केल्याचे या नेत्यांनी बाहेर सांगितले.
7 / 9
परंतु आता या भेटीबाबत वेगळीच माहिती समोर येत आहे. विरोधकांच्या बंगळुरूत होणाऱ्या बैठकीला शरद पवारांनी जाऊ नये त्याऐवजी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत शरद पवारांनी यावे असा आग्रह करण्यासाठी अजित पवारांसह इतर नेत्यांनी पवारांची भेट घेतली होती.
8 / 9
भाजपाच्या सांगण्यावरूनच ही भेट झाल्याचेही बोलले जाते. शरद पवार यांनाच एनडीएत आणण्याचा भाजपाचा प्लॅन होता. त्यामुळे दोन दिवस शरद पवारांची मनधरणी केली जात होती. आदल्या दिवशी मंत्र्यांनी आणि दुसऱ्या दिवशी आमदारांनी पवारांना विनंती केली होती.
9 / 9
शरद पवारांवर एनडीए येण्यासाठी दबाव आणला जात होता. परंतु पवारांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत एनडीएत जाण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी बंगळुरूत काँग्रेस नेतृत्वात होणाऱ्या बैठकीला हजेरी लावली.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे