Corona Virus: देवाक काळजी रे! कोरोनामुळे राज्यात देऊळ बंद; भाविकांनी 'या' मंदिरात जाऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:48 IST
1 / 10तूळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बेमुदत काळासाठी बंद करण्यात आलं आहे. 2 / 10देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर बंद करण्यात आलं आहे. 3 / 10कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढता संसर्ग लक्षात घेता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत4 / 10आळंदी येथे माऊलींचं दर्शन भाविक भक्तांना घेता येणार नाही. 5 / 10मुंबईतील प्रसिद्ध प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलं आहे. 6 / 10मुंबईतील मुंबादेवी मंदिरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केले आहे. 7 / 10कोल्हापूर येथील जोतिबा मंदिर बंद, दख्खनचा राजा जोतिबाचे गाभारा दर्शन भाविकांना बंद केले आहे. मुखदर्शन सुरू आहे. सर्व दार दरवाजे बंद केले आहेत.8 / 10शिर्डी येथील साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९४१ साली कॉलरामुळे ब्रिटिशांनी रामनवमी उत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद ठेवले होते. ८९ वर्षापूर्वीच्या निर्णयाची आजच्या निर्णयाने पुनरावृत्ती होत आहे.9 / 10कोरोना व्हायरसच्या धर्तीवर अनेक मोठे निर्णय होत आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. 10 / 10शनिशिंगणापूर येथील शनी मंदिरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलं आहे