शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: कोरोना रुग्णवाढीमुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी; ‘या’भागात पुन्हा लॉकडाऊन होणार?

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 1:39 PM

1 / 10
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचं संकट पुन्हा वाढू लागलं आहे. लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे, त्यामुळे कोरोनाबाबत निर्धास्तपणा येत असल्याने रुग्णसंख्येला खाली जात असलेला आलेख पुन्हा वर येऊ लागला आहे. रविवारी आणि सोमवारी दिवसभरात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
2 / 10
सुरुवातीच्या काळात कोविड(Covid 19)बाबत नागरिकांच्या मनात भीती होती, पोलीस आणि प्रशासनानेही कडक निर्बंध आखले होते, मात्र लॉकडाऊन उघडल्यापासून आता हळूहळू नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहिशी होऊ लागली आहे. मास्क घालणं, सोशल डिस्टेंसिंगचं पालन या गोष्टीकडे नागरिक दुर्लक्ष करू लागले आहेत.
3 / 10
गेल्या ४८ तासांत राज्यात ६ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागच्या २ आठवड्यात हा आकडा २१ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने ठाकरे सरकार चिंतेत सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात परत लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
4 / 10
सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु कोरोना संपला असं सगळेजण वागत आहेत, कोरोनाला अटकाव करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवावे असं सांगतानाच नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
5 / 10
लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार, उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द होऊ शकतो, ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने रद्द होणार
6 / 10
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिलेत. जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडला आहे.
7 / 10
मराठवाड्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात लॉकडाऊन लागण्याची शक्यता कमी असली तरी ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी परिसरात लॉकडाऊन केला जाऊ शकतो. मुंबईतही काही भागात लॉकडाऊन करण्याची स्थिती आहे
8 / 10
मुंबईतल्या वार्डामध्ये कोरोना हॉटस्पॉट आढळला आहे. नेहरू नगर, टिळक नगर, विक्रोळी, घाटकोपर- अंधेरी, जोगेश्वरी पूर्व याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, त्यामुळे याठिकाणी पुन्हा मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले जाऊ शकते.
9 / 10
मुंबईत गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात दररोज ३०० ते ३५० रुग्ण आढळत होते. मात्र आता दररोज सरासरी ६०० ते ६५० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आढावा घेऊन रुग्णसंख्येतील वाढ मोठी असल्यास लोकलबाबत फेरविचार केला जाईल असं पालिका प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केलं आहे.
10 / 10
१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकलचा प्रवास करण्याची मुभा दिली आहे, लोकलमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं काहींचे म्हणणं आहे, कारण लोकल प्रवास करताना कोणत्याही प्रकारे काळजी घेता येत नाही, लोकलमधील गर्दी आणि मास्क नसल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईCorona vaccineकोरोनाची लस